राज्यात २०२४ च्या निवडणुकीचा विजय महाविकास आघाडीला शक्य- एकनाथ खडसे

    11-Apr-2023
Total Views |
2024-elections-possible-for-Mahavikas-Aghadi -Eknath-Khadse

मुंबई
: राज्यात २०२४च्या विधानसभा निवडणुकांची रणनिती आपापल्या परीने सर्वच पक्ष करत आहेत. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सत्तेत येईल, असा दावा केला आहे. महाविकास आघाडीतील मित्र पक्ष एकत्र निवडणुका लढवतील, असे चित्र आहे. दरम्यान, एकनाथ खडसेंनी बोलताना वाजपेयी सरकारचा संदर्भ दिला. "एनडीए सरकारच्या सत्तास्थापनेत एकूण ३२ पक्ष सामील झाले होते, त्यामुळेच अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होऊ शकले," असेही खडसे म्हणाले.

"महाविकास आघाडीतही तीन मित्र पक्ष असल्याने महाराष्ट्रात आम्ही एकत्र सत्तेत येऊ शकतो," असा विश्वास खडसेंना वाटतो. तरीही मित्र पक्षांत असलेले मतभेद बऱ्याचदा चव्ह्याटावर आले आहेत. शरद पवारांची अदानी प्रकरणाबाबतची भूमिका असो किंवा काँग्रेसमधील अंतर्गत वाद यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता नाकरता येत नाही. एकंदरीत, महाविकास आघाडीतील एकजूट विधानसभा निवडणुकांपर्यंत टिकून राहील का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.