संस्कृतीप्रसारासाठी २०२३-24 माजी विद्यार्थी वर्ष म्हणून पाळले जावे

10 Apr 2023 13:22:40
vinay iccr 
 
मुंबई : दि. ९ एप्रिल २०२३ रोजी iccr (इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स) स्थापनेला ७४ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त झालेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी २०२३-24 हे वर्ष माजी विद्यार्थी वर्ष म्हणून पाळले जावे अशी विनंती केली. भारतातून दरवर्षी अनेक राष्ट्रांतून अनेक विद्यार्थी विविध प्रकारचे शिक्षण घेतात व उत्तीर्ण होऊन आपापल्या देशांत परत जातात. या विद्यार्थ्यांशी भारताने सांस्कृतिक संबंध जोपासले असता भारतीय संस्कृतीचा प्रसार ऑइल अशी आशा सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केली.
 
सहस्त्रबुद्धे पुढे म्हणाले, "भारत मोठ्या प्रमाणावर परदेशातून भारतात शिक्षण घेण्यास येणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्ञान प्रदान करतो. यात आफ्रिका, लॅटिन अमेरिका, मध्य आशियायी देश, दक्षिण आशियायी देश आणि कित्येक शेजारील देशांतून येणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना iccr च्या माध्यमातून शिक्षण दिले जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर आपण निर्माण केलेल्या भारतीयाचे माजी विद्यार्थी प्लॅटफॉर्मशी जोडून घेण्याचे आवाहन करतो. आज मी iccr च्या वतीने सर्व भारतीयांना आवाहन करतो, २०२३-२४ हे वर्ष भारताचे माजी विद्यार्थी वर्ष म्हणून घोषित करावे. आणि अशा सर्व मंचावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करावे. जे विद्यार्थी शिक्षण घेऊन मायदेशी परततात त्यांनी आपल्यासोबत भारताची उत्तम प्रतिमा आपल्यासोबत घेऊन जावी, त्यासाठी आपण प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे. यासोबतच सरकारच्या इतर विभागांसाठी कल्चर काणेकर ही संकल्पना सुद्धा राबवण्याचा विचार iccr करत आहे. भारताबाहेरील भारतीय संस्कृती केंद्रांची याकडे लक्षपूर्वक पाहून या संकल्पनेची वृद्धी व्हावी असा विचारकारायला हवा. यामुळेच आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक देवाणघेवाणीला बळकटी येईल आणि चालना मिळेल."
 
 
Powered By Sangraha 9.0