डोंबिवली :सुप्रसिद्ध लेखक डॉ सच्चिदानंद शेवडे यांच्या मातोश्री सुमंगला सुरेश शेवडे यांचे शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास दीर्घ आजाराने चेंबूर येथील निवासस्थानी निधन झाले. त्या ८१ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, त्यांच्या पत्नी, नातवंडे आणि पतवंडे असा परिवार आहे.
सुमंगला यांनी लेखक, व्याख्याते, चरित्रकार आणि इतिहासकार असलेल्या डॉ सच्चिदानंद शेवडे यांच्या सारखे व्यक्तीमत्व त्यांनी घडविले. वयाच्या १७ व्या वर्षी फ्रॉक ते नऊवारी लुगडे असा विवाहोत्तर त्यांच्या पहेरावात बदल झाला. सुमंगला यांचे पती सुरेश यांनी त्यांना नऊवारी साडी नेसण्याची अट घातली होती. व ते तत्त्व त्यांनी शेवटपर्यंत निभावले. भारताचार्य सुरेश शेवडे हे देखील कीर्तन व प्रवचन करीत असे. याशिवाय शहापूर, पडद्या, वाडा आदी ठिकाणी त्यांनी मुख्याध्यापक म्हणून काम केले आहे. कार्यक्रम ही करीत असत. शिवाय तत्त्वाशी तडजोड नाही. त्यामुळे सोळा वर्षांच्या नोकरीत त्यांनी तब्बल तेरा नोकऱ्या बदलल्या. त्यानंतर त्यांनी या क्षेत्राला कायमचा रामराम ठोकला.
सुरेश हे नेहमी कामानिमित्त बाहेर असल्याने तिन्ही मुलांची जबाबदारी सुमंगला यांनी यशस्वीपणे पार पाडली. सुमंगला या कडक शिस्तीच्या होत्या. त्यांनी तिन्ही मुलांवर चांगले संस्कार केले. डॉ. शेवडे यांनी त्यांच्या ' सेक्युलर्स नव्हे फेक्युलर्स' या पुस्तकाचे प्रकाशन आपल्या आईच्या हस्ते ठाण्यात केले. प्रकाशन सोहळया पूर्वी त्या थोड्या संकोचल्या होत्या. पण नंतर कौतुकमिश्रीत आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. त्यांच्यावर चेंबूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.