तुकाराम बीजेला देहूत थरथरतं झाड; भाविकांची झाड पाहायला गर्दी

09 Mar 2023 15:49:30

tukabij 
 
मुंबई : संत तुकारामांनी १६५० साली फाल्गुन कृष्ण पक्षाच्या दुस-या दिवशी मध्यानीला आपला देह सोडला असं सांगितलं जातं. यावर्षी हा दिवस ९ मार्च रोजी आला आहे. या दिवसाचे औचित्य साधून अनेक भाविक देहूची वारी आजच्या दिवशी करतात. मंदिराच्या परिसरात आजच्या दिवशी एक ठराविक झाड थरथरतं अशी भाविकांची श्रद्धा आहे.
 
तुकाराम बीजेचा सोहळा याचि डोळा पाहायला लाखो भाविक देहूतल्या विठ्ठल मंदिरात गर्दी करतात. तुकोबारायांच्या नामाच्या जयघोषात आसमंत भरून निघतो आणि त्या दिवशी देवळाच्या आवारातलं एक झाड थरारतं असं सांगितलं जातं.
 
विठोबाचे परम भक्त असलेल्या तुकोबांनी अंधश्रद्धा आणि समाजातील अनिष्ट रुढींवर भाष्य केले. समाजप्रबोधनाचे मोठे कार्य त्यांनी आपल्या हयातीत केले तसेच आपल्या अभंगातून प्रबोधन ते आजतागायत करत आहेत. शिवाजी महाराजही त्यांना आदर्श मनात अशा संत तुकोबाराय यांचे फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ-गमन झाले, असे मानले जाते. “आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा रामराम घ्यावा, अमुचा रामराम घ्यावा” असे म्हणत तुकोबा विठ्ठलवारीला निघाले.
 
 
Powered By Sangraha 9.0