आर्ट डेको अंगठ्याची पुन्हा चलती

09 Mar 2023 17:14:58

tanishk  
 
मुंबई : तनिष्क ज्वेलर्स यांनी आर्ट डेको पद्धतीची कला कुसर असलेल्या अंगठ्या बाजारात आणल्यानंतर अचानकपणे त्यांची मागणी वाढलेली दिसून येते. साखरपुडा किंवा लग्न जमवताना आपल्या जिवलगांना देण्यासाठी युगुले या अंगठ्या खरेदी कात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आपल्या जिवलगाची प्रतिकृती असेल अशा विशेष बनावटीच्या हिऱ्याच्या अंगठ्या तनिष्क तयार करत आहे.
 
आर्ट डेको पद्धतीचा इतिहास
आर्ट डेको फॅशन युगाचा उगम फ्रान्समध्ये १९१० आणि १९३० च्या दरम्यान झाला असे म्हटले जाते. पर्शिया, चीन आणि रशिया सारख्या इतर देशांकडून प्रेरणा घेतल्याने ते अधिक आकर्षक झाले. अनेक प्रकारच्या डिझाईन्सने 20 च्या दशकाच्या काळात आर्ट डेको बँड रिंग अत्यंत लोकप्रिय बनल्या. आर्ट डेको रिंग्स 20 च्या दशकात फ्लॅपर्स आणि सफ्रेगेट्सच्या आवडत्या होत्या, कारण त्यांना रंगीबेरंगी कपड्यांसह ठळक व मोठ्या डिझाईन्स आणि रत्नजडित दागिने परिधान करायला आवडत होते. हळूहळू, आर्ट डेको ज्वेलरी मागे पडली परंतु आज ती पुन्हा लोकांच्या पसंतीस उतरत आहे.
 
या सोन्याच्या अंगठ्या बॅगेट्स, चौरस, वर्तुळे, आयत आणि त्रिकोण या आकारात उपलब्ध होतात. आर्ट डेको एमराल्ड एंगेजमेंट रिंग्सचे आणखी एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे त्या रंगीबेरंगी रत्न जसे की पन्ना, नीलम, माणिक, नीलम आणि हिरे यांचा वापर करून बनवल्या जातात.
 
  
Powered By Sangraha 9.0