निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या काळजावर घाव केलायं!
भाजप सोबत पुन्हा जाणार का? या प्रश्नावर राऊत चवताळून उठले
09-Mar-2023
Total Views |
Sanjay Raut (File Photo)
मुंबई (Sanjay Raut on Election Commision) : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेला पक्ष तोडता, फोडता आणि चोर-लफंग्यांच्या हातावर ठेवता, कोण तुम्हाला माफ करेल?, असा सवाल उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. भाजप-शिवसेना युती होणार का?, याबद्दल प्रश्न विचारला असता संजय राऊत चवताळून उठले. तुम्ही माफीचे वाटप करायला बसला आहात का? महाराष्ट्राच्या काळजात घुसलेला हा बाण आहे, हा घाव आहे. महाराष्ट्र आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष कधीही विसरणार नाही.
मुंबईतील पत्रकार परिषदेत त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, "आम्ही माफ करा अशी मागणी केलेली नाही. आम्ही ठरवायचंय की त्यांना माफ करायचं की नाही. ज्या पद्धतीने त्यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी लढणारा, प्रखर हिंदुत्ववादी पक्ष केंद्रीय तपास यंत्रणा आणि पैशांचा वापर करून तोडला हा महाराष्ट्रावर केलेला आघात आहे. त्यामुळे भाजपला यासाठी माफ करायचे की नाही हे या राज्याची जनता ठरवेल. मात्र, त्यांनी केलेला जो गुन्हा आहे. त्यामुळे सहन करावी लागणारी वेदना विसरणार नाही, असेही ते म्हणाले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.