पुणेकरांना मिळालं मोठं गिफ्ट! रिंगरोड यंदाच्या वर्षीच होणार पूर्ण

    09-Mar-2023
Total Views |
ring-road-project-will-be-completed-this-year-itself-devendra-fadnavis-big-announcement


मुंबई
: पुणेकरांसाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात भरीव तरतूदी केल्या आहेत. पुण्यातील रस्त्यांसाठी भरघोस निधीची तरतूद केली आहे. यात पुणे रिंगरोडसाठी भरीव निधीची तरतूद केली जाणार आहे. मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या कामासाठी हा निधी दिला जाणार आहे. विरार-अलिबाग मार्गासाठीही निधीची दिला जाणार आहे.

तसेच रायगड जिल्ह्यातील रेवस ते रेड्डी, सिंधुदुर्ग सागरी महामार्गासाठी निधी राखीव ठेवला जाणार आहे. हायब्रीड अ‍ॅन्युईटीतून 7500 कि.मी.चे रस्ते 90,000 कोटी रुपये खर्च करून उभे केले जाणार आहेत. आशियाई बँक प्रकल्पातून 468 कि.मी.चे रस्ते/4000 कोटी रुपये दिले जाणार आहेत. रस्ते व पुलांसाठी 14,225 कोटी रुपये, यातून 10,125 कि.मी.चे कामे, 203 पूल व मोर्‍यांची कामे केली जाणार आहेत.

तसेच जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग : 4500 कि.मी मार्गांसाठी /3000 कोटी रुपये, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना : 6500 कि.मी.चे रस्ते उभारणी केली जाणार आहे. मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद शेतरस्त्यांसाठी नवी योजना आणली जाणार असून राज्यातील सीमावर्ती भागातील गावांमध्ये रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्यासाठी योजना राबवण्यात येणार आहे.

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.