ठाकरेंनी ब्रेक लावला पण फडणवीस-शिंदेंनी मेट्रो नेली सुस्साट!

09 Mar 2023 19:01:47
metro work development thackeray vs fadnavis shinde govt


मुंबई
: महाविकास आघाडी सरकारच्या काळात विकास कामांना लावलेला ब्रेक उखडून टाकत फडणवीस-शिंदे सरकारने विकासाला गती दिली आहे. आरे कारशेडवरुन निव्वळ राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना हा मोठा दणका मानला जात आहे. आरे कारशेडच्या मुद्द्यावरून राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न पुरेपूर फसला. मुंबईत आता एकूण मुंबईत ३३७ किलोमीटर मेट्रोचे जाळे विणण्यात फडणवीस यांना यश आले आहे. यापैकी ४६ किलोमीटरचा मार्ग खुला करण्यात आला असून आणखी ५० किमी मार्गाचे लोकार्पण यंदाच्या वर्षीच केले जाणार आहे.

फडणवीस-शिंदे सरकारचे नवीन महत्वकांशी प्रकल्प कोणते?
 
 
- मुंबई मेट्रो १० : गायमुख ते शिवाजी चौक मीरा रोड/९.२ कि.मी/४४७६ कोटी

- मुंबई मेट्रो ११ : वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/१२.७७ कि.मी/८७३९ कोटी रुपये

- मुंबई मेट्रो १२ : कल्याण ते तळोजा/२०.७५ कि.मी/५८६५ कोटी रुपये

- नागपूर मेट्रोचा दुसरा टप्पा: ४३.८० कि.मी./६७०८ कोटी

- पुणे मेट्रो : ८३१३ कोटींची कामे प्रगतीपथावर

- अन्य नवीन प्रकल्प : ठाणे वर्तुळाकार मेट्रो, नाशिक निओ मेट्रो, पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते निगडी कॉरिडॉर आणि स्वारगेट ते कात्रज मेट्रो

Powered By Sangraha 9.0