महाराष्ट्राचे महाबजेट : फडणवीसांनी मांडलेलं 'पंचामृत' ध्येय काय आहे?

    09-Mar-2023
Total Views |
maharatsra budget Panchamrit Yojana
 

मुंबई : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प हा पंचामृत योजनेद्वारे समजून सांगितला. तळागाळातील प्रत्येक घटकांचा या अंतर्गत सामावेश करण्यात आला असून पंचामृत योजनेच्या लाभासाठी कोट्यवधींची तरतूदही करण्यात आली आहे.
 
-प्रथम अमृत एकूण : 29,163 कोटी रुपये निधी
 
शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी विभागांसाठी तरतूद

- कृषी विभाग : 3339 कोटी रुपये

- मदत-पुनर्वसन विभाग : 584 कोटी रुपये

- सहकार व पणन विभाग : 1106 कोटी रुपये

- फलोत्पादन विभाग : 648 कोटी रुपये
 
- अन्न व नागरी पुरवठा विभाग : 481 कोटी रुपये
- पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय विभाग : 508 कोटी रुपये

- जलसंपदा, लाभक्षेत्र विकास, खारभूमी विभाग : 15,066 कोटी रुपये
 
- पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग : 3545 कोटी रुपये

- मृद व जलसंधारण विभाग : 3886 कोटी रुपये

द्वितीय अमृत एकूण : 43,036 कोटी रुपयांचा निधी


महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास या अंतर्गत करण्यात आला आहे.

विभागांसाठी तरतूद


- महिला व बालविकास विभाग : 2843 कोटी रुपये

- सार्वजनिक आरोग्य विभाग : 3501 कोटी रुपये

- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग : 16,494 कोटी रुपये

- इतर मागास बहुजन कल्याण विभाग : 3996 कोटी रुपये

- दिव्यांग कल्याण विभाग : 1416 कोटी रुपये

- आदिवासी विकास विभाग : 12,655 कोटी रुपये

- अल्पसंख्यक विकास विभाग : 743 कोटी रुपये

- गृहनिर्माण विभाग : 1232 कोटी रुपये

- कामगार विभाग : 156 कोटी रुपये

तृतीय अमृत एकूण : 53,058 कोटी रुपये


भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास

विभागांसाठी तरतूद

- सार्वजनिक बांधकाम विभाग : 19,491 कोटी रुपये

- ग्रामविकास व पंचायतराज विभाग : 8490 कोटी रुपये

- नियोजन व रोजगार हमी योजना विभाग : 10,297 कोटी रुपये

- नगरविकास विभाग : 9725 कोटी रुपये
 
- परिवहन, बंदरे विभाग : 3746 कोटी रुपये
 
- सामान्य प्रशासन विभाग : 1310 कोटी रुपये

चतुर्थ अमृत एकूण : 11,658 कोटी रुपये

रोजगारनिर्मिती, सक्षम, कुशल-रोजगारक्षम युवा

विभागांसाठी तरतूद

- उद्योग विभाग : 934 कोटी

- वस्त्रोद्योग विभाग : 708 कोटी


- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विकास विभाग : 738 कोटी रुपये
 
- शालेय शिक्षण विभाग : 2707 कोटी रुपये

- उच्च व तंत्रशिक्षण विभाग : 1920 कोटी रुपये

- वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग : 2355 कोटी रुपये

- क्रीडा विभाग : 491 कोटी रुपये

- पर्यटन विभाग : 1805 कोटी रुपये

पंचम अमृत एकूण : 13,437 कोटी रुपये
 
पर्यावरणपूरक विकास


विभागांसाठी तरतूद

- वन विभाग : 2294 कोटी रुपये

- पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग : 224 कोटी रुपये

- उर्जा विभाग : 10,919 कोटी रुपये

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.