धनगर समाजासाठी १ हजार कोटींचा निधी देणार!

    09-Mar-2023
Total Views |
devendra-fadnaviss-big-gift-to-dhangar-samaj


मुंबई
: राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना धनगर समाजासाठी महत्वाची घोषणा केली आहे. धनगर समाजाला एक हजार कोटींचा निधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. महाराष्ट्र मेंढी, शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना केली जाणार आहे. तसेच शेळी-मेंढी पालनासाठी १० हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. धनगर समाजासाठी एक हजार कोटींचा निधी दिला जाणार आहे.
 
 
सद्यस्थितीतील एकूण २२ योजनांचे एकत्रिकरण, मंत्रिमंडळ शक्तीप्रदत्त समितीमार्फत अंमलबजावणी केली जाणार आहे. महाराष्ट्र मेंढी व शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना केली जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार असून अहमदनगर येथे या महामंडळाचे मुख्यालय असणार आहे. राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेत मेंढीपालनासाठी भरीव निधी दिला जाणार असल्याचेही फडणवीस म्हणाले.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.