महाराष्ट्राचा महाअर्थसंकल्प २०२३ : LIVE Updates

09 Mar 2023 14:19:36
maharashtra budget 2023

Devendra Fadnavis



मुंबई (
maharashtra budget 2023) : भाजप-शिवसेना युती सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. अर्थमंत्री म्हणून फडणवीस यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प ठरला. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच आयपॅडच्या माध्यमातून अर्थसंकल्प वाचला गेला. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस आयपॅडच्या माध्यमातून बजेट वाचून दाखवत असताना सुरुवातीलाच संत तुकोबाराय यांचे स्मरण केले.

अर्थसंकल्पातून नेमकं काय मिळालं?

- छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष. या महोत्सवासाठी 350 कोटी रुपये
- आंबेगाव (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान: 50 कोटी

- मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्याने : 250 कोटी रुपये

- शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय. शिवकालिन किल्ल्यांचे संवर्धन : 300 कोटी रुपये

अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प

‘पंचामृत’ ध्येयावर आधारित

1) शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी

2) महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास

3) भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास

4) रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा

5) पर्यावरणपूरक विकास कृषी क्षेत्रासाठी तरतूद -

कांदा उत्पादकांना मदत करणात

नमो शेतकरी सन्मान योजना जाहीर

राज्य सरकार्राकडून वार्षिक सहा हजारांची मदत दिली जाणार

याचा एक कोटी १५ लाख कुटुंबांना लाभ

यासाठी ६ हजार नऊशे कोटी प्रस्तावित

कृषी विमा हप्ताही आता राज्य सरकार भरणार ; शेतकऱ्यांना केवळ एक हजार भरावे लागणार

महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेतिल शेतकऱ्यांना ५० हजारांचा लाभ देण्यात आला

महाकृषी विकास अभियान योजना जाहीर - कृषी उत्पादन वाढीसह

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आता

12,000 रुपयांचा सन्माननिधी

- प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारची भर

- नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

- प्रतिशेतकरी, प्रतिवर्ष 6000 रुपये राज्य सरकार देणार

- केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये प्रतिवर्ष मिळणार

- 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ

- 6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार
महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आता केवळ 1 रुपयांत पीकविमा

- आधीच्या योजनेत विमाहप्त्याच्या 2 टक्के रक्कम शेतकर्‍यांकडून

- आता शेतकर्‍यांवर कोणताच भार नाही. राज्य सरकार भरणार हप्ता

- शेतकर्‍यांना केवळ 1 रुपयांत पीकविमा

- 3312 कोटी रुपये भार राज्य सरकार उचलणार
महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना कर्जमाफी योजनांचे लाभ

- 2017 च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरित पात्र शेतकर्‍यांना योजनेचे लाभ देणार

- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभ या सरकारने दिले.

- 12.84 लाख पात्र शेतकर्‍यांच्या खात्यात 4683 कोटी रुपये थेट जमा.
गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आता राज्य सरकारकडून, लाभही 2 लाखांपर्यंत

- गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना यापूर्वी विमा कंपन्यांकडून

- आता गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

- ही योजना राज्य सरकार राबविणार, त्यामुळे शेतकर्‍यांचा पूर्ण त्रास वाचणार

- अपघातग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबांना पूर्वीच्या 1 लाखाहून आता 2 लाख रुपयांपर्यंत लाभ
काजू बोंडूवर प्रक्रिया केंद्र, काजू फळ विकास योजना!

- 200 कोटी रुपयांच्या भांडवलासह कोकणासाठी काजू बोर्ड

- काजू बोंडूपेक्षा प्रक्रिया काजू बोंडूला 7 पट भाव

- उत्पन्नवाढीसाठी कोकणात काजू बोंडू प्रक्रिया केंद्र

- कोकण, चंदगड तसेच आजरा (कोल्हापूर) येथे काजू फळ विकास योजना

- 5 वर्षांसाठी 1325 कोटी रुपयांची तरतूद



Powered By Sangraha 9.0