आता मुलींना मिळणार ७५ हजार रुपये!

09 Mar 2023 16:29:01
maharashtra-budget-2023-lek-ladki-scheme-for-girl-child-get-75000-after-18-years

मुंबई
: 'लाडकी लेक मी संतांची, मजवरी कृपा बहुतांची' या ब्रीदावर चालविल्या जाणाऱ्या ‘लेक लाडकी’ योजने अंतर्गत मोठी घोषणा करण्यात आली आहे. ही योजना आता नव्या स्वरूपात आणली जाणार आहे. मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना आता नव्या स्वरूपात आणत असल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
 
या योजनेचा लाभ पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना मिळू शकणार आहे. या अंतर्गत जन्मानंतर मुलीला 5000 रुपये मिळतील. मुलगी पहिलीत गेल्यानंतर 4000 रुपये तर सहावीत 6000 रुपये तर अकरावीत गेल्यानंतर 8000 रुपये मिळणार आहेत. त्यानंतर मुलगी 18 वर्षांची झाल्यावर पुढील शिक्षणासाठी 75,000 रुपये इतकी रक्कम मिळणार आहे.


 
Powered By Sangraha 9.0