मोठी बातमी! आशा-अंगणवाडी कर्माचाऱ्यांसाठी वेतनात भरघोस वाढ

    09-Mar-2023
Total Views |
maharashtra-budget-2023-asha-anganwadi-workers-steep-increase-in-salary-big-announcement-from-the-budget
 
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पातून अंगणवाडी सेविकांसाठी मोठं गिफ्ट मिळालं आहे. नुकताच महिला दिन साजरा झाला. या अंतर्गत राज्य सरकारने विविध कल्याणकारी योजनांची घोषणा केली आहे. या अंतर्गत अंगणवाडी सेविकांसाठीही मोठी घोषणा केली आहे. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात आल्याची माहिती अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
 
- आशा स्वयंसेविकांचे मानधन ३५०० वरुन ५००० रुपये
 
- गटप्रवर्तकांचे मानधन ४७०० वरुन ६२०० रुपये
 
- अंगणवाडी सेविकांचे मानधन ८३२५ वरुन १०,००० रुपये

- मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन ५९७५ वरुन ७२०० रुपये

 
- अंगणवाडी मदतनिसांचे मानधन ४४२५ वरुन ५५०० रुपये

- अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची २०,००० पदे भरणार

- अंगणवाड्यांमार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली

अशा मोठ्या घोषणा त्यांच्यासाठी करण्यात आल्या आहेत.

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.