आता प्रत्येकाच्या खात्यात १२ हजार रुपये! राज्य सरकारची मोठी घोषणा

09 Mar 2023 15:13:04
maha-budget-2023-big-relief-for-farmers-now-you-will-get-12-thousand-per-year

मुंबई
: महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आता एकूण १२ हजार रुपयांचा सन्माननिधी प्राप्त झाला आहे. यात पंतप्रधान कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारची भर घालण्यात आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, असे या योजनेचे नाव जाहीर करण्यात आले आहे. प्रतिशेतकरी, प्रतिवर्ष सहा हजार रुपये केंद्र सरकारतर्फे दिले जातात. आता राज्य सरकारही शेतकऱ्यांना एकूण सहा हजार रुपये देणार आहे. केंद्राचे ६ हजार आणि आणि राज्याचे ६००० असे १२,००० रुपये प्रतिवर्ष मिळणार आहेत. राज्यातील १.१५ कोटी शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या अंतर्गत ६९०० कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार आहे.
 
केवळ १ रुपयांत पीकविमा

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आता केवळ एका रुपयात पीकविमा मिळणार आहे. अवकाळी पाऊस, नापिकी, ओला सुका दुष्काळ या समस्यांवर शेतकऱ्याला दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला आहे. आधीच्या योजनेत विमाहप्त्याच्या २ टक्के रक्कम शेतकर्‍यांकडून घेतली जात होती. मात्र, आता शेतकर्‍यांवर कोणताच भार नाही. राज्य सरकार भरणार हप्ता आहे. शेतकर्‍यांना केवळ १ रुपयांत पीकविमा मिळणार आहे. या अंतर्गत ३३१२ कोटी रुपये भार राज्य सरकार उचलणार आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडताना दिली आहे.

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना कर्जमाफी योजनांचे लाभ

- २०१७ च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरित पात्र शेतकर्‍यांना योजनेचे लाभ देणार

- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभ या सरकारने दिले.

- १२.८४ लाख पात्र शेतकर्‍यांच्या खात्यात ४६८३ कोटी रुपये थेट जमा.
 
 
Powered By Sangraha 9.0