कोकणच्या काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी!

    09-Mar-2023
Total Views |
konkan cashew center
 
मुंबई : राज्य सरकारतर्फे अर्थसंकल्पात कोकणातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. काजू बोंडूवर प्रक्रिया केंद्र आणि काजू फळ विकास योजनेद्वारे उत्पन्न दुप्पटीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. दोनशे कोटींच्या भांडवलासह कोकणासाठी काजू बोर्ड स्थापन केले जाणार आहे. काजू बोंडूपेक्षा प्रक्रिया काजू बोंडूला सात पट भाव मिळणार आहे. त्पन्नवाढीसाठी कोकणात काजू बोंडू प्रक्रिया केंद्र स्थापन केले जाणार आहे. कोकण, चंदगड तसेच आजरा (कोल्हापूर) येथे काजू फळ विकास योजना राबविली जाणार असून पाच वर्षांसाठी १३२५ कोटींची तरतूद केली जाणार आहे.