शिंदे म्हणाले युवराज भावी मुख्यमंत्री! आदित्य ठाकरे दचकले!

09 Mar 2023 13:14:45

Aditya Thackeray (1)

भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे, अशी घोषणा वरळीच्या व्यासपीठावर करण्यात आली.

मुंबई : मंचावर भाषण सुरू असताना भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे म्हणून उल्लेख झाला आणि पुन्हा एकदा राजकीय वर्तूळात चर्चा रंगली आहे. जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमानिमित्त वरळीत मतदार संघात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वरळीला एकनाथ शिंदेंनी हादरे दिल्यानंतर युवराज पुन्हा एकदा आपला किल्ला मजबूत करण्याच्या तयारीत आहेत. इथूनच भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे, अशी घोषणा ठाकरे समर्थकांनी केली आहे.

यावेळी उबाठा गटाचे नेते सुनील शिंदे म्हणाले की, "वरळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचीही आहे. आज जमलेल्या तमाम महिला भगिनी ज्यांच्यामध्ये सरस्वीतीचे, लक्ष्मीचे आणि भोगा देवीचं रुप आहे. याच सर्वांच्या आशीर्वादाने आदित्य ठाकरे मुख्यमंत्री बनून येतील, अशी ग्वाही देतो आणि खात्री देतो. याच व्यासपीठावर आपण त्यांचे स्वागत करू, ही वस्तूस्थिती आहे. अतिशयोक्ती नाही.", असे शिंदे म्हणाले. दरम्यान, ही घोषणा दिल्यानंतर आदित्य ठाकरे एकदम दचकले. त्यांनी शिंदेंना नमस्कार केला. त्यावेळी आदेश बांदेकरही मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाला रश्मी ठाकरेही हजर होत्या.


स्वप्न पहायला कुणालाही बंधनं नाहीत!
आदित्य ठाकरे भावी मुख्यमंत्री म्हणून घोषित झाल्यानंतर मंत्री दीपक केसरकर यांनी याबद्दल प्रतिक्रीया दिली आहे. स्वप्न पहाण्यासाठी कुणालाही बंदी नाही. स्वप्न पहावीत. त्यांच्यावर बोलणं योग्य नाही. ज्यांच्या मनात मुख्यमंत्री व्हायचे आहे, त्यांनी लोकांशी कसं बोलावं वागावं, तसे ते शिकतील, अशी मला अपेक्षा आहे, असे दीपक केसरकर म्हणाले.

केवळ सत्तेची स्वप्न पडतायतं!
आदित्य ठाकरेंना पुढील मुख्यमंत्री व्हायचं आहे, हे ठीक आहे. पण अशाप्रकारे उत्साहाच्या भरात कार्यकर्ते घोषणाबाजी देतात. राष्ट्रवादीत सुप्रिया सुळे, अजितदादा सर्वच भावी मुख्यमंत्री म्हणून समजले जातात. आदित्य ठाकरे हा मुख्यमंत्री पदाचा चेहरा होऊच शकत नाही. राजकारणात स्वप्न माणसांने कुठलीही पहावीत. स्वप्न तडीस जातील की नाही, याचाही विचार करावा, राजकारणात ज्येष्ठ व्यक्तीमत्व आहेत. ती काय करतील, आज मलाही वाटेल पण तसं होत नाही, असा टोला आमदार संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे.



Powered By Sangraha 9.0