मोठी बातमी! आता राज्यात कुठेही घेता येणार मोफत उपचार!

09 Mar 2023 16:11:56
aapla-dawakhana-will-be-started-at-500-places-in-the-state

मुंबई : मुंबईत १६० ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने सुरू करण्यात आले. सात लाखांहून अधिक रुग्णांना याचा लाभ घेतला. ३१ मार्च पर्यंत एकूण २०० दवाखाने मुंबईत तयार होतील. तसेच राज्यभरात एकूण पाचशे ठिकाणी दवाखाने सुरू केले जाणार आहेत. आरोग्य विभागातर्फे माता सुरक्षित तर कुटूंब सुरक्षित अभियान सुरू करण्यात आले. तसेच राज्यात ४ कोटी ५० लाख माताभगिनींची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच जागरुक पालक अभियानातून सुरुवात झाली.

शून्य ते १८ या वयोगटातील ९४ हजार मुलांना त्याचा लाभ घेतला आला. भविष्यातील याचे लक्ष्य २ कोटी इतके होईल. मुंबईपाठोपाठ राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयी आपला दवाखाना सुरु होणार आहे. सुमारे ५०० ठिकाणी आपला दवाखाना सुरु करण्यात येईल. मुंबईत सुरु केलेल्या दवाखान्याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. घराजवळ असलेल्या दवाखान्यामुळे लगेच उपचार मिळायला सुरु झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील ही संकल्पना राज्यातील तालुक्यात विस्तार करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

केंद्र सरकारने राज्यातील रेल्वेचे प्रकल्प, नगर विकास विभागाचे विविध प्रकारच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. मुंबई शहराला आणखी विकसित करण्यावर भर दिला जात असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.एकूण ५०० ठिकाणी आपला दवाखाना सुरु केला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

 
Powered By Sangraha 9.0