मुंबई : ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत एसटी प्रवासानंतर आता महिलांसाठी सरसकट ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. फडणवीस- शिंदे सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात सवलतीत प्रवास देण्याचा महत्वपूर्ण घेतला आहे. यापूर्वी केवळ ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी प्रवास ही सवलत दिली जात होती. तसेच शालेय विद्यार्थीनींनाच अशा प्रकारची सवलत देण्यात येत होती. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सरकारे हा महत्वपूर्ण निर्णय घोषित केला आहे.
महिलांना एसटी प्रवासात सरसकट 50 टक्के सुट घोषित करत असल्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिटदरात महिलांना 50 टक्के सवलत दिली जाणार आहे. चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर उभे केले जाणार आहे.
राज्य सरकारचे महिला दिनानिमित्त मोठे गिफ्ट
- कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर
- मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना
- महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण
- माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात 4 कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार
फडणवीस शिंदे सरकारने महिलांसाठी नेमक्या कोणत्या घोषणा केल्या आहेत?
-लाडकी लेक मी संतांची, मजवरी कृपा बहुतांची...
-‘लेक लाडकी’ योजना नव्या स्वरूपात
- मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना आता नव्या स्वरूपात
- पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना लाभ
- जन्मानंतर मुलीला 5000 रुपये
- पहिलीत 4000 रुपये, सहावीत 6000 रुपये
- अकरावीत 8000 रुपये
- मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये मिळणार आहेत.