मुंबई : राज्याचा हा अर्थसंकल्प हा गाजर हलवा अर्थसंकल्प आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. राज्याच्या बजेटवर बोलताना त्यांनी विधीमंडळात ही प्रतिक्रीया दिली आहे. यापूर्वीचे दोन ते तीन अर्थसंकल्प महाविकास आघाडीने मांडले होते. अजित पवार यांनी अर्थमंत्री म्हणून हे अर्थसंकल्प सादर केले होते. परिस्थिती कशी होती हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. कोरोना काळ होता. केंद्र सरकारतर्फे जीएसटीची थकबाकी केवळ २५ हजार कोटींच्या वर कधीही देत नसत.
मात्र, आत्ता महाशक्तीचा पाठींबा असलेले सरकार आहे. तरीही काही फरक दिसत नाही. अद्यापही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बांधावर अद्याप मदत पोहोचली नाही. मध्यमवर्गीयांच्याओठाला मधाचं बोट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. महाविकास आघाडीच्या काळातील योजनांचे नामकरण करून त्या पुन्हा मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुरू केल्या जाणाऱ्या दवाखान्यांची व्याप्ती आता राज्यभर होणार आहे. ही बाब चांगली आहे. याबद्दल एका वाक्यात गाजर हलवा, असा अर्थसंकल्प आाहे, असे मला वाटतं, असेही ठाकरे म्हणाले.