रिक्षाचालकांसाठी शिंदे सरकारचं मोठं गिफ्ट

09 Mar 2023 17:23:09
Shinde government's big gift for rickshaw operators


मुंबई
: राज्यातील ऑटो रिक्षा चालकांसाठी महामंडळ स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या अंतर्गत विविध लोकोपयोगी योजना राबविल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. विविध समाजघटकांच्या संस्थांसाठी भरीव निधी देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. बार्टी, सारथी, महाज्योती, अमृतसह अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, श्यामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ, इतर मागासवर्गिय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती, भटक्या जमाती विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्यक आर्थिक विकास महामंडळांना भरीव निधी देणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
 
संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळाला सुद्धा निधी उपलब्ध करून देणार, असल्याचेही ते म्हणाले. छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानवविकास संस्थेचे (सारथी) नाशिक येथे विभागीय कार्यालय, सुसज्ज अभ्यासिका, मुला-मुलींचे वसतीगृह यासाठी 50 कोटी रुपये देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


09 March, 2023 | 17:27

नवीन महामंडळांची स्थापना भरीव निधी सुद्धा देणार


- असंघटित कामगार : महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ
 
- लिंगायत तरुणांना रोजगार : जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ

- गुरव समाज : संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ

- रामोशी समाज : राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ

- वडार समाज : पैलवान कै. मारूती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ

- ही महामंडळे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळांतर्गत

 
- प्रत्येकी 50 कोटी रुपयांचा निधी देणार




Powered By Sangraha 9.0