एप्रिलमध्ये होणारी महाविकास आघाडीची बैठक एप्रिलफुलसारखी-संजय शिरसाट

09 Mar 2023 09:50:46
 
Sanjay Shirsat
 
 
मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची संयुक्त बैठक बुधवारी ८ मार्च रोजी विधान भवनात झाली. त्यात एप्रिल ते मे या कालावधीत ‘मविआ’च्या संयुक्त सभा घेण्याची रणनीती आखली गेली. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात महाविकास आघाडीच्या संयुक्त सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या सभांचा कार्यक्रम आणि नियोजनासंदर्भात १५ मार्च रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांची बैठक होणार आहे.
 
छत्रपती संभाजीनगरातून प्रारंभ मविआच्या संयुक्त सभांचा प्रारंभ २ एप्रिलपासून छत्रपती संभाजीनगर येथून केला जाणार आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात हे सभेला मार्गदर्शन करणार आहेत. १६ एप्रिल रोजी नागपूर, १ मे रोजी मुंबई, १४ मे रोजी पुणे, २८ मे रोजी कोल्हापूर, ३ जून रोजी नाशिक आणि नंतर अमरावती येथे संयुक्त सभा घेतली जाणार आहे.
 
दरम्यान यावर आमदार संजय शिरसाट यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, "संजय राऊतांना प्रकाश आंबेडकरांनी लायकी दाखवली. मविआत कधीही बिघाड होईल. प्रशांत किशोरांनी ९५ जागा शिवसेना जिंकेल असा सर्व्हे दिलेला. आम्ही ४५ जागा जिंकू. सर्व्हे कधीच परिपूर्ण नसतो. आघाडीची लवकरच बिघाडी होणार आहे." असं ते म्हणाले.
 
 
Powered By Sangraha 9.0