"नागालॅण्डमध्ये पवारांनी ५० खोके घेतले का?"

09 Mar 2023 12:50:34
NCP in nagaland ? 

Eknath Shinde



मुंबई :
विधानसभा अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असताना पन्नास खोके एकदम ओक्के, अशा घोषणा विरोधी पक्षांनी दिल्या. याच वेळी नागालँमधील समीकरणांचा विधानसभेत उल्लेख पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी नागालँण्डमध्ये राष्ट्रवादीने दिलेल्या बिनशर्त पाठींब्याचा उल्लेख केला. आम्हाला ५० खोके एकदम ओक्के म्हणणाऱ्यांनी नागालॅण्डमध्येही ५० खोके घेतले का, असा सवाल गुलाबराव पाटील यांनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही गुलाबराव पाटील यांच्या याच उल्लेखाचा पुनरुच्चार केला. "जो कांच के घरों में रहते हैं वो दुसरो के घरों पर पत्थर फेंका नहीं करते, असे म्हणत शिंदेंनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना सुनावले. इतरांकडे बोट दाखवताना तीन बोट आपल्याकडे असतात हे राष्ट्रवादी काँग्रेसने लक्षात ठेवले पाहिजे. आमच्यावर खोके घेतले म्हणून टीका करणाऱ्यांवर स्वतःवर एकदा झालेली टीका सहन झाली नाही.", असेही ते म्हणाले.

"पवार साहेब म्हणाले आम्ही भाजपला नाही तर मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला. आजवर पवार साहेबांनी जे सांगितलं त्याच्या अगदी उलट घटना घडल्या आहेत. ज्याप्रमाणे नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला तसाच तो २०१४ मध्येही दिला होता. आमच्यावर आरोप करण्यापूर्वी त्यांनी हे लक्षात ठेवावे की जो कांच के घरों में रहते हैं वो दुसरो के घरों पर पत्थर फेंका नहीं करते", असा टोलाही त्यांनी लगावला आहे.



Powered By Sangraha 9.0