तीन वर्षांत १० लाख घरे! प्रत्येकाला मिळणार घर

09 Mar 2023 17:45:46
Modi Awas Gharkul Yojana


मुंबई
: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येकाला घर संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या मोदी आवास घरकुल योजने अंतर्गत इतर मागासवर्गीयांसाठी तीन वर्षांत १० लाख घरांची निर्मिती केली जाणार आहे. ‘मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत सर्वांसाठी घरे उपलब्ध करून देण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. यावर्षी १० लाख घरांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आखला जात आहे.

- प्रधानमंत्री आवास योजना: ४ लाख घरे
(२.५ लाख घरे अनुसूचित जाती-जमाती, १.५ लाख इतर प्रवर्ग)
 
- रमाई आवास : १.५ लाख घरे/१८०० कोटी रुपये
(किमान २५ हजार घरे मातंग समाजासाठी)

- शबरी, पारधी, आदिम आवास : १ लाख घरे/१२०० कोटी रुपये
 
- यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत: ५०,००० घरे/६०० कोटी
(२५,००० घरे विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी धनगर : २५,००० घरे)

- इतर मागासवर्गियांसाठी नवीन घरकुल योजना : मोदी आवास घरकुल योजना : ३ वर्षांत १० लाख घरे /१२,००० कोटी रुपये
(या योजनेत यावर्षी ३ लाख घरे बांधणार/३६०० कोटी रुपये)

 
 
Powered By Sangraha 9.0