आता प्रत्येक घरात मिळणार शुद्ध पाणी!

09 Mar 2023 15:41:02
Har Ghar Water Life Mission


मुंबई
: राज्य सरकारतर्फे केंद्राच्या महत्वकांशी जल जीवन मिशन योजनेअंतर्गत तब्बल २० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. हर घर जल: जनजीवन मिशनद्वारे पाण्याबरोबर स्वच्छताही हे अभियान राबविले जाणार आहे. जलजीवन मिशन अंतर्गत १७.७२ लाख कुटुंबांना नळजोडणी करण्यासाठी हा सुमारे २०,००० कोटी रुपये हा निधी वर्ग केला जाणार आहे. तसेच १६५६ एमएलडी क्षमतेचे मलनिस्सारण प्रकल्प असणार आहेत.

 
तसेच १०,००० कि.मी.च्या मलजलवाहिनी बांधणी केली जाणार आहे. तसेच ४.५५ कोटी मेट्रीक टन कचर्‍यावर प्रक्रिया करून प्रदुषण रोखण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. राज्यातील २२ नागरी संस्थांना १२४ यांत्रिक रस्तासफाई वाहने दिली जाणार आहे. ग्रामीण भागात १५,१४६ घनकचरा, सांडपाणी प्रक्रिया कामे केली जाणार आहेत. तसेच ५००० गावांमध्ये सुरु करणार जलयुक्त शिवार २.० ची सुरुवात केली जाणार आहे. जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा ५००० गावांमध्ये राबविला जाणार असून गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेस ३ वर्ष मुदतवाढही देण्यात आली आहे.

 
Powered By Sangraha 9.0