मासेमार कुटूंबांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा!

09 Mar 2023 17:14:55
Devendra Fadnavis

मुंबई : मासेमार कुटुंबांच्या कल्याणासाठी ५० कोटींचा मत्स्यविकास कोष तयार केला जाणार आहे. या अंतर्गत विमा आणि डिझेल अनुदानाचा दिलासा देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. प्रकल्पबाधित मासेमारांना नुकसानभरपाईसाठी धोरण राबविणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरणार आहे, असेही ते म्हणाले.

प्रकल्पामुळे विस्थापित वा तात्पुरत्या प्रभावित मासेमार कुटुंबांना मदत देण्यासाठी प्रकल्पाच्या २ टक्के वा ५० कोटी रुपयांचा मत्स्यविकास कोष तयार केला जाईल. मासेमारांना डिझेल अनुदानासाठी यांत्रिक नौकेच्या १२० अश्वशक्तीची अट काढली, अशी माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे ८५ हजार अधिकच्या मासेमारांना लाभ मिळणार आहे. वर्षानुवर्षाचा अनुशेष यावर्षी पूर्णत: दूर करणार, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिली. यासाठी २६९ कोटी रुपयांची तरतूद त्यांनी केली. पारंपारिक मासेमारी करणार्‍या मासेमार बांधवांसाठी केंद्राच्या मदतीने ५ लाखांचा विमा दिला जाणार आहे.


Powered By Sangraha 9.0