इंदुमिल स्मारकासाठी ७४१ कोटी रुपयांचा निधी देणार!

    09-Mar-2023
Total Views |
741 crore fund for Indumil Memorial


मुंबई
: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंदूमिल स्मारकासंदर्भात अर्थसंकल्पात मोठी घोषणा करण्यात आली आहे. ३४९ कोटींच्या आधीचा निधीमिळून ७४१ कोटींचा निधी दिला जाणार असल्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तुळापूर आणि वढूबुद्रूक स्मारकांसाठी निधी

 
- भिडेवाडा (पुणे) येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक: ५० कोटी रुपये

- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाटेगाव (सांगली) स्मारक : २५ कोटी रुपये

 
- हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक : ३५१ कोटी रुपये

- स्व. रा. सू. गवई स्मारक, अमरावती : २५ कोटी रुपये
 
- विचारवंत कै. नरहर कुरुंदकर स्मारक, नांदेडसाठी निधी

- स्व. शिवाजीराव देशमुख स्मारक, कोकरुड (सांगली) : २० कोटी रुपये

 
महाराष्ट्राचे वैभव असलेल्या धार्मिक क्षेत्रांचा विकास


- श्री संत सेवालाल महाराज स्मारक पोहरादेवी, उमरी तीर्थक्षेत्र विकास : ५०० कोटी रुपये

- भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, वैजनाथ या पाचही महाराष्ट्रातील ज्योर्तिंलिंगांसह प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी : ३०० कोटी रुपये

- श्री क्षेत्र ज्योतिबा परिसर संवर्धन प्राधीकरण : ५० कोटी रुपये

 
- श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळ, ऋणमोचन विकासासाठी : २५ कोटी रुपये

 
- श्री चक्रधर स्वामी महानुभाव संबंधित रिद्धपूर, काटोल, भिष्णूर, जाळीचा देव, पोहीचा देव, नांदेड, पांचाळेश्वर, पैठण विकासासाठी भरीव निधी

- प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज स्मारकासाठी भरीव निधी

 
- गहिनीनाथ गडाच्या संवर्धन-विकासासाठी : २५ कोटी रुपये

- श्री संत जगनाडे महाराज आर्ट गॅलरी, नागपूर: ६ कोटी रुपये

- श्री संत जगनाडे महाराज समाधीस्थळ, सुदुंबरे (पुणे) : २५ कोटी रुपये

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव स्मरण स्वातंत्र्यसमराचे...

 
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रेरणेने झालेल्या स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृत्यर्थ आष्टी, वर्धा येथे स्मारक

- विदर्भात झालेल्या जंगल सत्याग्रहाची तीन ठिकाणी स्मारके

 
- मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त पुरेसा निधी

माय मराठीच्या सेवेसाठी...

 
- श्री क्षेत्र रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन क रणार

- विश्वकोष कार्यालय वाई (सातारा), मराठी भाषा भवन, ऐरोली येथे इमारतींची कामे

- मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी मराठी भाषा युवक मंडळे

- सांगली नाट्यगृहासाठी २५ कोटी रुपये

- राज्यातील सर्व नाट्यगृहांच्या दुरुस्तीसाठी : ५० कोटी रुपये

- दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव, कोल्हापूर चित्रनगरी येथे आंतरराष्ट्रीय सुविधांसाठी : ११५ कोटी रुपये

- कलाकार आणि कलाप्रकार जतनासाठी महाराष्ट्र कलाकार कल्याण मंडळाची स्थापना
 
- विदर्भ साहित्य संघाला शताब्दीनिमित्त : १० कोटी रुपये

- स्व. शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधी आता ५० कोटी रुपयांचा

अन्य विभागांसाठी आर्थिक तरतूद...


- गृह विभाग : २१८७ कोटी रुपये

- महसूल विभाग : ४३४ कोटी रुपये

- वित्त विभाग : १९० कोटी रुपये
 
- सांस्कृतिक कार्य विभाग : १०८५ कोटी रुपये
 
- मराठी भाषा विभाग : ६५ कोटी रुपये

- विधी व न्याय विभाग : ६९४ कोटी रुपये

- माहिती तंत्रज्ञान व माहिती जनसंपर्क विभाग : १३४२ कोटी रुपये

- महाराष्ट्र विधान मंडळ : ५०० कोटी रुपये


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.