नागालँडमध्ये सर्वपक्षिय सरकार

08 Mar 2023 17:52:13
opposition-less-government-in-nagaland-all-parties-including-ncp-support-bjp-alliance


कोहीमा
: राज्य विधानसभा निवडणुकीत नागालँडमध्ये भाजप आणि एनडीपीपी या आघाडीला ६० पैकी ३७ जागांवर बहुमत मिळाले असून तेच सत्ताधारी आहेत. भाजपसोबतच्या या आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदार निवडून आलेले असून त्यांनीही भाजप आघाडीत सहभागी होण्यास अनुकूलता दाखवली आहे.
 
दरम्यान राज्यातील अन्य पक्ष देखील या आघाडीत सहभागी होणार असून राज्यात येत्या काळात सर्वपक्षीय सरकार अस्तित्वात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नागालँड मध्ये विधानसभेच्या ६० जागा आहेत, येथे भाजप आणि एनडीपीपी या दोन पक्षांनी स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली आहे. या आघाडीला साठ पैकी ३७ जागा मिळाल्या आहेत.

नागालँडमध्ये एकही पक्ष विरोधात बसायला तयार नसून सर्वच विरोधी पक्ष हे सत्तेत सहभागी होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. नागालँडमध्ये २०१५ पासून हे घडत आले आहे. मात्र या वेळी विजेत्या पक्षांचा शपथविधी होण्याच्या आगोदरपासूनच विरोधकांनी सत्तेत सहभागी होण्यास अनुकूलता दाखवली आहे.

नागालँड सरकारचा शपथविधी सोहळा मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, नागालँडचे राज्यपाल ला गणेशन, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या उपस्थितीत झाला.नागालँडमध्ये गतवेळीही देखील विरोधी पक्ष नव्हता, येथे सर्वपक्षीय सरकार होते. यावेळी देखील तशीच परिस्थिती निर्माण होत आहे.

Powered By Sangraha 9.0