मनसेत महिलांना संधी - राज ठाकरेंचे महिलांना आवाहन

08 Mar 2023 15:52:10
राज ठाकरे बोले- हमारे पास योगी नहीं भोगी है, मनसे प्रमुख ने की उप्र के सीएम  की तारीफ; उद्धव पर तंज - MNS chief Raj Thackeray praises Yogi Adityanath  after order to 
मुंबई : जागतिक महिला दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महिलांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर महिलांनी मोठ्या प्रमाणात राजकारणात यावे असे त्यांनी सांगितले. मनसे महिलांना संधी देणार असल्याचेही त्यांनी या पत्रकातून जाहीर केले.
महिला दिनानिमित्त राज ठाकरे यांनी शुभेच्छा देत महिलांसाठी संदेश देत फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. राज ठाकरे म्हणाले, "आज जागतिक c. सर्वप्रथम तमाम स्त्रीवर्गाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा. सगळ्या चौकटी मोडून, आज सर्वच क्षेत्रामंध्ये स्त्रियांची जी घौडदौड सुरु आहे ती थक्क करणारी आहे." वर्तमान काळातील महिलांची कारकीर्द पाहता ते पुढे म्हणाले, "आज ग्रामीण भागातील असो की शहरी भागातील, इथल्या मुलींना उच्च शिक्षणाची , स्वतःच करिअर घडवायची प्रचंड ओढ आहे. आणि त्यासाठी त्या घरापासून लांब, इतर शहरांत किंवा परदेशांत नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने सहज स्थिरावत आहेत, आणि जिथे जातील तिथे स्वतःचा ठसा उमटवत आहेत. हे चित्र आनंददायी आहे."
पुढे स्त्रियांचे कौतुक करत राज म्हणतात, "100,150 वर्षांपूर्वी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळावा म्हणून प्रचंड संघर्ष करावा लागत होता अशी परिस्थिती होती. आणि त्याच समाजात मोठमोठ्या उद्योगसमूहांच्या व्यवस्थापनापासून ते जागतिक अर्थकारणात उलाढाली करणाऱ्या संस्थांमध्ये मोठ्या पदांवर स्त्रिया कार्यरत आहेत. इतकंच काय देशाची अर्थव्यवस्था, परराष्ट्र व्यवहार, सीमांचं संरक्षण ते थेट राष्ट्रपतीपदी स्त्रिया आपला ठसा उमटवत आहेत. आणि हे सर्व त्यांनी निव्वळ स्वकर्तृत्वावर कमावलं आहे. म्हणूनच आता स्त्रियांनी आता राजकारणात देखील मोठ्या प्रमाणावर यायला हवं. ‘जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवणं’ हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं ध्येय आहे, आणि हे साध्य करायचं असेल तर स्त्रियांचा सहभाग देखील तितकाच महत्वाचा आहे, ह्याची आम्हाला जाणीव आहे. म्हणूनच विविध क्षेत्रांत स्वतःला सिद्ध करणाऱ्या स्त्रियांनी राजकारणात यावं, त्यांना संधी देण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्सुक आहे."
 
Powered By Sangraha 9.0