अखिल भारतीय महिला लोककला संमेलनाचे आयोजन मुंबईत

    08-Mar-2023
Total Views |

womans day 
 
मुंबई : दि. ८ मार्च रोजी जगतात महिला दिन साजरा केला जातो. यावर्षी अखिल भारतीय लोककला संमेलनाचे आयोजन मुंबईत केले आहे. संगीत नाटक अकादमी आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमात महिला विविध कलांचे सादरीकरण करतील. तसेच कलाकारांचे अम्मेलन पार पडेल.
 
यावेळी महाराष्ट्राच्या तारपा व गौरी नृत्यासोबतच कर्नाटकचे डोलू कुनीथा आणि राजस्थानचे कुलबेलिया नृत्य पाहावयास मिळेल. भक्तिरंग सदरात गोदावरी मुंडे भजन सादर करतील तर चंदाबाई तिवाडी भारूड सादर करतील. लोकरंग सदर अंतर्गत शाहीर कल्पना माळीपोवाडा गातील, प्रमिला लॉगडेकर-सूर्यवंशी लावणी सादर करतील तर झेबा बानू कव्वाली पेश करणार आहेत.
 
याचसोबत शिक्षण क्षेत्रातील आणि लोककला क्षेत्रातील निवडक स्त्रियांचा सत्कार केला जाणार आहे. आम्ही आनंदयात्री या २०२३ कार्यक्रमात हे संमेलन सादर होणार आहे. ५ दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाचे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होतं आहे तर उपमुख्यअंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपथिती लाभणार आहे. प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे हे संमेलन पार पडणार आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.