दिल्ली मद्य घोटाळा – चंद्रशेखर राव यांच्या मुलीची चौकशी

08 Mar 2023 19:00:19
delhi-liquor-scam-case-telangana-cm-chandrasekhar-raos-daughter-summoned-by-ed
 
नवी दिल्ली : दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी मनीष सिसोदिया यांच्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आता तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी आणि विधान परिषदेच्या सदस्या कविता यांना समन्स पाठवले आहे. ईडीने त्यांना आज चौकशीसाठी बोलावले आहे.


दिल्ली मद्य घोटाळ्याची चौकशी केली जात आहे. त्याविषयी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख नेते मनीष सिसोदिया सध्या तुरूंगात आहेत. त्याचप्रमाणे दिल्ली येथील विशेष न्यायालयाने हैदराबादस्थित व्यापारी अरुण रामचंद्रन पिल्लई यास १३ मार्चपर्यंत ईडी कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले आहेत. हा व्यापारी कविता यांचा निकटवर्तीय असल्याचा तपासयंत्रणां संशय आहे.


बीआरएस नेत्या कविता मद्य घोटाळ्यातील साऊथ कार्टेलचा भाग असल्याचा ईडीचा आरोप आहे. त्यांनी लाचखोरीद्वारे दिल्लीचे मद्य धोरण बदलून आर्थिक लाभ घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. ईडी आणि सीबीआय या दोघांनीही आरोप केला आहे की साऊथ कार्टेल लॉबीच्या लाचखोरीमुळे मद्य धोरणामध्ये अनियमितता झाली. दक्षिण कार्टेलमध्ये कथितपणे आंध्र प्रदेशातील वायएसआरसीपी खासदार के कविवट, मगनुंथा श्रीनिवासलू रेड्डी यांचा समावेश होता.

 
Powered By Sangraha 9.0