परदेशी नोकरीच्या नावाने महिलांची विक्री; दोघांना अटक

08 Mar 2023 16:01:48
cheated-on-the-pretext-of-giving-a-job-abroad-two-arrested-for-selling-women


मुंबई
: परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या आमिष दाखवून महिलांची फसवणूक करणार्‍या दोन आरोपींना काशिमीरा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. परदेशात नोकरी देतो, असे आमिष दाखवून महिलांची फसवणूक केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. अशरफ मैदु कैवारी आणि नमिता सुनील मालुसरे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून ही टोळी ओमान-मस्कत देशात घरकामाच्या नोकरीचे दरमहा ३० हजार रुपये पगाराचे आमिष दाखवून त्याठिकाणी महिलांची विक्री करत असल्याचीही माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
 
तसेच, ज्यांनी या महिलांना विकत घेतले असेल, त्यांच्याकडून जी कामे सांगण्यात येतील, ती कामे त्यांना करणे भाग होते. एवढेच नाही, तर जर या महिलांना भारतात परत यायचे असल्यास त्यांच्याकडे तीन लाख रुपयांची मागणी करण्यात येई. या महिलांचे पासपोर्टदेखील स्वतःकडे ठेवून घेत कित्येक महिलांची फसवणूक या दोघांकडून करण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले.




Powered By Sangraha 9.0