आदित्य ठाकरेंनी लिहीले शिंदेंना पत्र!

08 Mar 2023 18:23:18

Aditya Thackeray
मुंबई : माजी पर्यटनमंत्री युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दोन नव्या विमानतळांची मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना पत्र लिहीले आहे. औद्योगिक आणि पर्यटन या दोन गोष्टींसाठी स्वतंत्र विमानतळांची मागणी त्यांनी केली आहे. आदित्य ठाकरेंच्या या पत्राला आता शिंदे काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी देशात ५० नव्या विमानतळांचा शुभारंभ करणार असल्याचे सांगितले होते. या पत्रात पुणे आणि नाशिकच्या विमानतळांची स्पष्टता तसेच पालघर व फर्दापूर जिल्ह्यातील नव्या विमानतळांची मागणी करण्यात आली आहे.




पुढील दहा वर्षांत मुंबईला तिसऱ्या नव्या विमानतळाची गरज आहे. याद्वारे शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांचा विकास होणार आहे. तसेच या भागातील औद्योगिक विमानतळाचा विकास हा नव्या कार्गोहबची निर्मिती करणारा ठरू शकतो, अशी मागणी पालघर विमानतळासाठी त्यांनी केली आहे. अजंठा लेण्यांच्या पर्यटनासाठी लाखो पर्यटक दरवर्षी जगभरातून येत असतात. याद्वारे भारतीय संस्कृतीचे दर्शन घडत असते. महाविकास आघाडी सरकारने हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा संकल्प सोडला होता. तसेच जागतिक बौद्ध धर्माचा वारसा म्हणून हा प्रकल्प नावारुपाला येईल, असा विश्वासही आदित्य यांनी व्यक्त केला आहे.



Powered By Sangraha 9.0