महिला दिनानिमित्त अखिल भारतीय महिला लोककला सन्मानाने सेवा विवेकच्या महिला सन्मानित !

    08-Mar-2023
Total Views |
Women of Seva Vivek honored with All India Women's Folk Art Award on the occasion of Women's Day

मुंबई : अखिल भारतीय महिला लोककला संमेलन मध्ये आज सेवा विवेक सामजिक संस्था आदिवासी महिलांसाठी जे कार्य करते त्याचा सन्मान करण्यात आला. रवींद्र नाट्य मंदिर येथे आज अखिल भारतीय महिला लोककला संमेलन ला सुरुवात झाली आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध विविध क्षेत्रात महिलांसाठी काम करणाऱ्या संस्था व व्यक्ती यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
 
सेवा विवेक सामजिक संस्था पालघर जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून आदिवासी महिला सक्षमीकरणात खूप मोठे काम करत आहे. आदिवासी महिलांना बांबू हस्तकलचे मोफत ट्रेनिंग देवून त्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देत आहे याचं कामाची दखल घेत आंतरराष्ट्रीय महिला दिनी अखिल भारतीय महिला लोककला संमेलन मध्ये सेवा विवेक सामाजिक संस्थाचा त्यांच्या कार्यासाठी सन्मानित करण्यात आले. प्रमुख पाहुणे मंत्री मंगलप्रभात लोढा ( महिला व सांस्कृतिक व पर्यटन) आणि मंत्री दिपक केसरकर ( शिक्षण व मराठी भाषा ) , डॉ. संध्या पूरेचा ( G-20 / W - 20 अध्यक्ष ) आणि श्री. अशोक घाडगे यांच्या उपस्थितीत सेवा विवेक सामजिक संस्थेकडून प्रगती भोईर ( ऑपरेशन हेड ) यांनी सन्मानचिन्ह स्वीकारले . त्याप्रसंगी उपस्थित मंत्री महोदय आणि मंचावरील मान्यवरांनी संस्थेच्या कामाचे कौतुक करताना संस्थेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सेवा विवेक सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून महिला सक्षमीकरणासाठी पालघर जिल्ह्यातील आदिवासी गरुजू महिलांना घर काम सांभाळून त्यांना आर्थिक हातभार लाभावा त्यांना सन्मान जनक रोजगार प्राप्त होवा ह्यातूने सेवा विवेक ने पुढाकार घेतला आहे. आज प्रयन्त शेकडो महिलांना बांबू हस्तकला प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवून दिला आहे. आज ह्या आदिवासी महिलांनी बांबू हस्तकलेपासून तयार केलेल्या वस्तू जगाच्या बाजारात विकल्या जात आहेत. ॲमेझॉन, फ्लिपकार्टवर दिसणाऱ्या बांबुचे, वेताचे पेन स्टॅण्ड, मोबाईल होल्डर, मेकअप बॉक्स किंवा अनेक लहान मोठ्या वस्तू या पालघर जिल्ह्यातील अनेक गावात तयार झालेल्या आहेत. आदिवासी पाड्यांवर तयार होणाऱ्या आणि आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी उपयुक्त ठरणाऱ्या रोजगार निर्मितीचे साधन ठरणाऱ्या अनेक वस्तू आता ऑनलाईन अर्थात जगाच्या पाठीवर पोहचल्या आहेत .


पालघर जिल्यातील विविध गावात तयार होणाऱ्या वस्तू सेवा विवेक च्या माध्यमातून ऑनलाईन बाजारपेठतहि उपलब्ध आहेत. बांबूपासून अनेक उपयुक्त आणि शोभेच्या वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण सेवा विवेक संस्थेने आदिवासी महिलांना दिले आहे. सेवा विवेक सामाजिक संस्थेतच प्रशिक्षण घेऊन मग प्रशिक्षक झालेल्या १० ते १२ महिलांनी आतापर्यंत शेकडो आदिवासी महिलांना या वस्तु तयार करण्याचे प्रशिक्षण दिले आहे. या महिलांच्या कार्याचा पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रम मध्ये कौतुक केले होते.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.