ICICI Lombard तर्फे महिलांसाठी विशेष ऑफर

    08-Mar-2023
Total Views |
 

- भारतातील सर्व महिलांना आरोग्य तपासणी आणि मोटारीबाबत तांत्रिक सहाय्य देणार
- आयसीआयसीआय लोम्बार्डच्या महिला विमा प्रतिनिधींसाठी व्यापक ज्ञान कार्यशाळा
ठाणे :  सर्वसाधारण विमा क्षेत्रातील भारतातील आघाडीची कंपनी  आयसीआयसीआय लोम्बार्डने आज जाहीर केले की महिलांना त्यांच्या शारीरिक आणि आर्थिक सुदृढतेत सक्षम करण्याच्या प्रयत्नांना पाठबळ देण्यासाठी कंपनी मार्च 2023 हा महिला महिना म्हणून साजरा करणार आहे. कंपनी महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी मोहिम राबविणार आहे. 


भारतातील प्रमुख केंद्रांवर दहा हजार महिलांसाठी फर्स्ट-कम-फर्स्ट-सर्व्ह या तत्त्वावर ही आरोग्य तपासणी मोहिम राबविली जाणार आहे. शिवाय, महिलांमध्ये उद्योजकतेला अधिक चालना देण्याच्या उद्देशाने कंपनी महिला एजंट आणि प्रतिनिधी यांची नियुक्ती आणि त्यांना शिक्षित करण्यासाठी सर्वसमावेशक प्रशिक्षण कार्यक्रमसुध्दा राबविणार आहे.  या संपूर्ण महिन्यात संबंधित इच्छुक महिला विविध ठिकाणी उघडण्यात आलेल्या मदत सेवा केंद्राचा (RSA) देखील लाभ घेऊ शकतील.


या उपक्रमाचा एक भाग म्हणून, आरोग्य निदान तपासणीत सीबीसी, थायरॉईड प्रोफाइल, व्हिटॅमिन डी आणि बी 12, आरबीएस, फेराटीन (आयर्न स्टडी) आदी चाचण्यांचा समावेश असेल. भारतातील महिला आमच्या आयएल टेककेअर अॅपद्वारे या सेवांचा लाभ घेऊ शकतात. सदर अँप त्यांच्या आरोग्य आणि विमा गरजा पूर्ण करण्यासाठी एक सोयीस्कर आणि वापरण्यास सुलभ असा ऑनलाईन मंच आहे.

 
या व्यतिरिक्त, विमा कंपनी महिला वाहनचालकांसाठी कंपनीने रस्त्याच्या बाजूला ठिकठिकाणी उभारलेल्या सहाय्यता सेवाकेंद्राची  (RSA) सुविधा देखील देत आहे. त्यांना वाहन चालवताना  कारमधील बिघाड, अपघात,  टायरची हवा जाणे, इंधनाची हानी, विद्युत बिघाड इत्यादी अडचणींवर या केंद्राच्या माद्यमातून मदत मिळू शकेल. या संपुर्ण महिन्यात महिला कारचालक तांत्रिक मदतीसाठी आयएलच्या ग्राहक मदत सेवा विभागाशी संपर्क साधू शकतात.
नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे (NFHS-5) नुसार, भारतातील 15-49 वयोगटातील केवळ 30 टक्के महिलांना आरोग्य संरक्षणाचे कवच प्राप्त झालेले आहे. 


यामुळे महिला लोकसंख्येचा एक मोठा भाग विमामुक्त राहतो.  जागरूकता, आर्थिक शिक्षण आणि सुलभतेच्या अभाव ही त्यामागील मुख्य कारणे आहेत. आजच्या जगात महिला यशाच्या पायऱ्या पटपट चढत असताना आणि अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवत असताना त्यांना आरोग्य विम्याच्या छताखाली आणणे अतिशय गरजेचे आहे. त्याद्वारे केवळ त्यांचे शाररीक आरोग्यच नव्हे तर त्यांचे आर्थिक आरोग्यही सुरक्षित करणे तितकेच महत्वाचे आहे आणि त्या माध्यमातून कुटूंबाप्रती आणि समाजाप्रती मौल्यवान योगदान देण्यात त्यांच्या प्रयत्नांना कंपनी एकप्रकारे हातभार लावणेही तितकेच आवश्यक आहे.  


कंपनीच्या या नवीन मोहिमेबद्दल बोलताना आयसीआयसीआय लोम्बार्डचे विशेष संचालक संजीव मंत्री म्हणाले की, आयसीआयसीआय लोम्बार्ड महिलांच्या आरोग्यावर, शारीरिक आणि आर्थिक अशा दोन्ही गोष्टींवर विशेष लक्ष केंद्रित करते. पारंपारिक पध्दतीने आपल्या कुटुंबाची काळजी घेणाऱ्या स्त्रिया अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आम्ही एक कंपनी म्हणून  या उपक्रमांद्वारे त्यांच्या प्रचंड योगदानाचा सन्मान करताना त्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेण्यासाठी त्यांच्यात जागरूकता निर्माण करु इच्छितो. याशिवाय, एक घटक  म्हणून विम्याच्या बाबतीत महिला खुपच वंचित राहिल्या असल्याने नवीन बदलाला एक गती देण्याचा आणि अधिकाधिक महिलांनी विमा उतरविणे आणि आर्थिक निर्णय प्रक्रियेत सक्रिय सहभागी होण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याचा आमचा हा एक प्रयत्न  असल्याचे श्री. मंत्री यांनी स्पष्ट केले.


भारतात सामान्य विम्याबद्दल महिलांची जागरूकता आणि वृत्ती याविषयी आयसीआयसीआय लोम्बार्डने  नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात महिलांच्या विमा उत्पादनांच्या खरेदीवर नियंत्रण ठेवणार्‍या काही बारीकसारीक गोष्टींचाही विचार केला आहे. सर्वेक्षणानुसार, 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 60 टक्के आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि सक्षम महिला सामान्य विमा उत्पादन (जनरल इन्शुरन्स) खरेदी करत असल्याचे आढळून आले आहे.


अधिकाधिक महिलांना त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याची जबाबदारी घेण्यास प्रोत्साहन देण्यासाठी, आयसीआयसीआय लोम्बार्ड सर्वेक्षणाच्या अहवालातील निष्कर्षांनुसार विमा आणि आर्थिक साक्षरतेकरिता विशेष दर्जेदार कार्यक्रम राबविणार आहे आणि त्या माध्यमातून  महिला एजंटची नोंदणी करणार आहे. आर्थिक जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच विमा पॉलिसींचे फायदे उलगडून दाखविण्यासाठी महिलांसाठी ही विशेष ऑफर तयार करण्यात आलेली आहे. हा अनोखा उपक्रम कंपनीचे कर्मचारी, ग्राहक, एजंट आणि विविध माध्यमातील भागीदार यांच्यासाठी सर्वसमावेशक आणि वैविध्यपूर्ण वातावरण निर्माण करण्याच्या कंपनीच्या दृष्टीकोनाशी अतिशय सुसंगत आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.