संजय राऊतांची औकात काही नाही, फक्त तोंडाच्या वाफा : संजय गायकवाड

    08-Mar-2023
Total Views |
 
Sanjay Gaikwad
 
मुंबई : आमच्या मित्रांना भांग पाजवली गेली, अशी खोचक टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या टीकेनंतर राऊतांनी भांग कुणी पाजली? त्यांनीच का? असा सवाल करतानाच महाराष्ट्रात भांग पिऊन कोण सत्तेवर आलंय? ती भांग उतरली की सत्ता जाईल, आम्ही पूर्णपणे शुद्धीत आहोत. राज्यातील जनताही शुद्धीत आहे, हे कसब्याच्या निकालाने स्पष्ट झालं. भागं पिऊन जे सत्तेत बसले आहेत. त्यांना कळेल महाराष्ट्र आणि राज्यातील जनता काय आहे. त्यांची सर्व भांग कसब्यात उतरली आहे. असं संजय राऊत म्हणाले.
 
दरम्यान, राउतांच्या या टीकेचा शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, "राऊतांनी जर विधीमंडळाचा आदर केला असता, तर त्याला चोरमंडळ म्हणाले नसते. संजय राऊतांची औकात नाही, फक्त तोंडाच्या वाफा काढण्याची त्यांनी सवय आहे. " असं संजय गायकवाड म्हणाले.