फायर ऑडिटसह अन्नधान्य साठा, पाणीपुरवठ्याचा पंतप्रधानांनी घेतला आढावा

08 Mar 2023 18:47:14
Prime Minister reviewed the foodgrain stock, water supply along with fire audit

नवी दिल्ली : देशातील आगामी उन्हाळ्यासाठी हवामान विभागासह प्रशासनाच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ७, लोककल्याण मार्ग या अधिकृत निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक घेतली.

बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हवामान विभागाने पुढील काही महिन्यांसाठीचे हवामान अंदाज आणि मान्सूनच्या संभाव्यतेबद्दल माहिती देण्यात आली. त्यांना हवामानाचा रब्बी पिकांवर होणारा परिणाम आणि प्रमुख पिकांच्या अंदाजे उत्पन्नाबाबतही माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे उष्णतेशी संबंधित आपत्ती, शमन करण्याचे उपाय आणि वैद्यकीय पायाभूत सुविधांची तयारी, सिंचन - पाणीपुरवठा, चारा आणि पिण्याच्या पाण्यावर लक्ष ठेवण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न, अत्यावश्यक वस्तूंची उपलब्धता आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्जता याबाबत पंतप्रधानांना राज्यांची सज्जता आणि रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांबद्दल माहिती देण्यात आली.

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान मोदी यांनी भारतीय अन्न महामंडळाला अन्नधान्याचा साठा सुनिश्चित करण्याचे आदेश दिले. जलाशयांमध्ये आणि आसपासच्या पाण्याच्या उपलब्धतेवर लक्ष ठेवण्याचेही त्यांनी यावेळी निर्देश दिले. देशातील सर्व रुग्णालयांच्या तपशीलवार फायर ऑडिटच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला. जंगलातील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी समन्वित प्रयत्नांची गरज असल्याचेही सांगण्यात आले. जंगलातील आग रोखण्यासाठी आणि त्यांचा सामना करण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी बदल केले पाहिजेत यावर चर्चा करण्यात आली.


Powered By Sangraha 9.0