"सिसोदियांची तुरुंगात हत्या होईल!"

आप नेत्याचा खळबळजनक दावा

    08-Mar-2023
Total Views |
manish sisodia


Manish Sisodia यांचे हे पोस्टर काँग्रेसच्या दिल्ली कार्यालयाबाहेरील आहे. नवी दिल्ली :
भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मनिष सिसोदिया यांची तुरुंगात हत्या होण्याची भिती आम आदमी पक्षाने व्यक्त केली आहे. सिसोदीया सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्रस तुरुंगातील क्रमांक १ मध्ये ठेवण्यात षडयंत्र असून अतिशय धोकादायक आणि हिंसक गुन्हेगार ठेवले जातात, असा आरोप आपचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याला विरोध म्हणून ध्यानधारणा करणार आहेत.


आपचे मुख्य प्रवक्ते सौरभ भारद्वाज म्हणाले की, "मनिष सिसोदिया यांच्याविरोधात केंद्र सरकार षडयंत्र रचत आहे. तिहार तुरुंगाच्या जेल क्रमांक १ मध्ये ठेवण्यात आले आहे. कैद्याला फर्स्ट ट्रायल अंतर्गत या तुरुंगात पआठविले जात नाही. हे कारागृह जगातील सर्वात हिंसक, धोकादायक आणि अपराध्यासाठी ओळखले जाते. तेथील हिंसेच्या बातम्या आपण वर्तमान पत्रात वाचत असतो .या तुरुंगात असे कैदी आहेत. जे कुणाच्याही एका इशाऱ्यावर कुणाचीही हत्या करू शकतात. इथे एकएका कैद्यावर डझनभर खुनाचे खटले सुरू आहेत. आम्ही भाजपचे राजकीय विरोधक आहोत. मात्र, अशाप्रकारे दुश्मनी काढली जाते का? तुम्ही आम्हाला दिल्लीत हरवू शकला नाहीत. आम्हाला एमसीडीमध्ये हरवू शकला नाहीत, त्याचा वचपा असा काढला जात आहे का?"

सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत केजरीवाल यांनी ध्यान केले. देशाच्या भल्यासाठी केल्या जाणाऱ्या या ध्यानापूर्वी ते राजघाटावर पोहोचले. त्यांनी महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळी जाऊन दर्शन घेतले. शाळा आणि रुग्णालये बांधणाऱ्या नेत्यांना देशात तुरुंगात पाठविले जात आहे. देशाच्या या स्थितीमुळे मी चिंतित आहे, असे म्हणत केजरीवालांनी ध्यानधारणा सुरू केली होती.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.