शालेय मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवून बलात्काराची धमकी

    08-Mar-2023
Total Views |
 
Iran School Girls
 
मुंबई : नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, इराणी शालेय मुलींना जबरदस्तीने अश्लील व्हिडिओ दाखवून बलात्काराची धमकी दिली जात आहे. याबाबच काही पालकांनी तक्रारीही केल्या, मात्र या तक्रारींची दखल गांभिर्याने घेतली जात नाहीय. हे काम इराणचे सुरक्षा दल करत असल्याचा दावाही केला जात आहे.
 
विद्यार्थिनींना शाळेत येणे बंधनकारक करण्यात आले असून हे व्हिडिओ जबरदस्तीने दाखवले जात आहेत. त्याचवेळी, सरकारविरोधात आंदोलन केल्यास त्यांच्यावर बलात्कार केला जाईल, अशी धमकी सुरक्षा कर्मचारी देत असल्याचेही अहवालात म्हटले आहे. इराणची राजधानी तेहरानमधील किमान 500 शाळांमध्ये हे अश्लील व्हिडिओ दाखवण्यात आल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
 
इराणमध्ये सध्या हिजाबच्या विरोधात जोरदार आंदोलन सुरू आहे. इराणमधील सुमारे 15,000 महिला दरवर्षी इतर देशांमध्ये जाण्यासाठी अर्ज देतात. इराणच्या युनिव्हर्सिटीमध्ये 50 टक्के स्त्रिया आहेत, परंतु केवळ 17 टक्के नोकरदार आहेत. इराणमध्ये सार्वजनिक ठिकाणी महिलांचा सहभाग असलेल्या हिजाबची तपासणी करण्यासाठी मॉरल पोलिस लागू केले जातात. प्रत्येक नोकरदार महिलेला हिजाब घालणे बंधनकारक असून ती कंपनीची जबाबदारी आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.