शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन राजकारण करु नये : फडणवीसांचा इशारा

    08-Mar-2023
Total Views |
 
Devendra Fadnavis
 
मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजपासून दुसरा आठवडा सुरू होत आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अवकाळीच्या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळालेत. त्यांनी विधानभवन पायऱ्यांवर आंदोलन केले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना तातडीनं मदत करण्याची मागणी केली. तसेच नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली.
 
"गुजरात सरकारने 350 कोटी रूपये कांदा उत्पादक शेतक-यांसाठी मदत जाहीर केली. आपल्याहून लहान राज्य असूनही गुजरातला जे जमलं ते महाराष्ट्राला का जमू नय़े असा सवाल राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केला. भारत सरकारने काहीही मदत केली नाही, शेतकरी हवालदिल झालाय असं ते म्हणाले." राज्यात अवकाळी पावसाने शेतक-यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेलाय. त्यामुळे आता राज्य सरकारने शेतक-यांना तातडीने मदत करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
 
यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले, "राज्यात 13 हजार 729 हेक्टर वरील शेतीचे नुकसान झाले आहे. राज्यातील आठ जिल्ह्यात शेतीचे नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली. तात्काळ मदतीचे प्रस्ताव मागवलेले आहेत. शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात येईल. दुपारनंतर पुन्हा अडपेट माहिती घेऊन निवेदन केले जाणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले. फेरीवाला धोरण अंमलबजावणी संदर्भात अहवाल ३ महिन्यात सादर करणार. मुख्यमंत्र्यांमार्फत राज्यातील सर्व महापालिकांना आदेश देणार." अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.