मोठी अपडेट! आमदार बच्चू कडूंना दोन वर्षांची शिक्षा

08 Mar 2023 15:01:26
 
Bachhu Kadu
 
मुंबई : प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यावर आमदार कडू यांनी हात उगारला होता. सरकारवाडा पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणात आमदार कडू यांना त्यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
 
२०१७ साली दिव्यांगांच्या मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी महापालिकेत आंदोलन केले होते. दिव्यांगांच्या विविध समस्या घेऊन बच्चू कडू आयुक्तांच्या दालनात गेले होते. त्यावेळी महापालिका आयुक्त व बच्चू कडू यांच्यात बाचाबाची झाली होती. त्यावेळी ते आयुक्तांवर धावून गेल्याचा त्यांच्यावर आरोप होता. नाशिक महापालिकेत अपंगांसाठी असलेला तीन टक्के राखीव निधी खर्च न केल्यामुळे झालेल्या वादात आमदार कडू आयुक्तांवर संतप्त झाले होते.
 
 
Powered By Sangraha 9.0