दिव्याला प्रकाशमान करणारी ’ज्योती’

    07-Mar-2023
Total Views |
Tanvi Foundation

मागील दहा वर्षांपासून दिवा शहरात ‘तन्वी फाऊंडेशन’च्या माध्यमातून येथील महिलांच्या प्रगतीसाठी सातत्याने झटणार्‍या समाजसेविका म्हणून ज्योती पाटील यांची ओळख आहे. आज जागतिक महिला दिनानिमित्ताने त्यांच्या कार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...


Tanvi Foundation

दिवा शहर हे तसे अनेक वर्षांपासून दुर्लक्षित. ठाणे महानगरपालिका हद्दीत असले तरीही येथे आजही अनेक समस्या आपल्याला पाहायला मिळतात. या शहरातील महिलांचे सर्वाधिक हाल पाणीसमस्येमुळे होतात. सामाजिक कार्य करत असताना महिलांच्या या समस्या जाणून घेऊन ज्योती पाटील यांनी पाणीप्रश्नावर आवाज उठवत महिलांना न्याय मिळवून देण्याचं प्रामाणिक प्रयत्न केला. आजही त्या महिलांच्या विविध समस्यांवर लढताना दिसतात. एकीकडे नागरीसमस्या सोडवण्याचं काम ज्योती पाटील करत असताना ‘तन्वी फाऊंडेशन’ आणि ‘तन्वी महिला पतपेढी’च्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे धोरण ज्योती पाटील यांनी राबवण्यास सुरुवात केलेली आहे. दिव्यातील महिलांना न्याय देणं व येथील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं, हेच ज्योती राजकांत पाटील यांचे ध्येय!


Tanvi Foundation

बचतगटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक आधार कसा मिळेल, यासाठी त्या प्रयत्न करत असतात. महिलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, सर्वसामान्य कुटुंबात असणार्‍या या महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत, यासाठी ज्योती पाटील यांची असणारी तळमळ शहरातीलअनेक गरजू महिलांना माहीत आहे.दिवा शहरात महिलांबाबत असणारी ज्योती पाटील यांची जाणीव त्यांना महिलांमध्ये लोकप्रिय ठरवण्यास कारणीभूत ठरते. केंद्र सरकारच्या विविध योजना, राज्य शासनाच्या विविध योजना व ठाणे महानगरपालिकेच्या विविध योजनांच्या माध्यमातून महिला, सर्वसामान्य नागरिक यांना थेट लाभ मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न ज्योती पाटील ’तन्वी फाऊंडेशन’च्या माध्यमातून करत असतात. मागील पाच वर्षे सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत असताना, ज्योती पाटील यांनी राजकीय क्षेत्रातदेखील आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून महिला नेतृत्व म्हणून दिवा शहरात त्या उदयास आल्या आहेत.


जागतिक महिला दिनानिमित्त ज्योती पाटील दरवर्षी दिवा शहरातीलकर्तृत्ववान महिलांचा सन्मान करत असतात. सर्वसामान्य कुटुंबात संघर्ष करणार्‍या महिलांना न्याय देण्याचे काम त्या महिला दिनाच्या माध्यमातून करत असतात. येणार्‍या काळामध्ये दिव्यातील महिला या प्रगत कशा होतील, यासाठी त्यांचं व्हिजन आहे. त्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू आहे. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळो, हीच सदिच्छा!

(प्रतिनिधी)
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.