चित्रपटांना दिल्या जाणाऱ्या अनुदानाचे उद्या वितरण

07 Mar 2023 18:18:18
Distribution of subsidy to films tomorrow

मुंबई : मराठी चित्रपट सृष्टीला सावरण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने विशेष प्रयत्न केले जात आहेत. राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाकडून दर्जेदार मराठी चित्रपटांच्या निर्मितीसाठी अर्थसहाय्य योजना राबविली जात आहे. यावर्षी दिल्या दर्जेदार चित्रपटांच्या निर्मितीसाठीचे अनुदानाचे वाटप उद्या बुधवार दि. ८ मार्च रोजी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते केले जाणार आहे. मंत्रालयातील समिती सभागृहात अनुदान वाटपाचा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.


शासनाने नियुक्त केलेल्या चित्रपट परीक्षण समितीने यंदाच्या अनुदानासाठी ४१ चित्रपटांना पात्र ठरवले आहे. यातील ०४ चित्रपटांना “अ” दर्जा तर “३३” चित्रपटांना “ब” दर्जा प्राप्त झाला आहे. तर ०४ चित्रपट विविध राज्य, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त असल्याने त्यांना शासन धोरणानुसार अ दर्जा देऊन अनुदान वितरीत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी अनुदानप्राप्त चित्रपटांचा संघ उपस्थित राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे देण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0