चिनी लक्ष्य आणि भक्ष्य

    07-Mar-2023   
Total Views |
China’s defence budget for 2023 to grow by 7.2%

‘ग्लोबल टाईम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार चीनने २०२३ साठी वार्षिक जीडीपीवाढीचे लक्ष्य पाच टक्के ठेवले आहे. ने २०२३साठी मसुदा अर्थसंकल्प जाहीर केला असून, त्यात देशाचे वार्षिक संरक्षण बजेट ‘सीएनवाय’ १.५५३७ ट्रिलियनपर्यंत म्हणजेच ७.२ टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या काही वर्षांतील चीनची ही लक्ष्यवाढ सर्वात कमी असल्याचे म्हटले जाते. चीनचे जीडीपीवाढीचे लक्ष्य आणि इतर विकास उद्दिष्टे सरकारी कार्य अहवालात जाहीर करण्यात आली आहेत. चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांनी रविवारी १४व्या नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या पहिल्या सत्रात सरकारी कामाचा अहवाल सादर केला आहे, असे येथील स्थानिक माध्यमांनी सांगितले.
 
चीनने २०३५ पर्यंत राष्ट्रीय संरक्षण आणि सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणाचे लक्ष्य निश्चित केले आहे, तर २०२७ पर्यंत ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ची शताब्दी उद्दिष्टे साध्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ‘नॅशनल पीपल्स काँग्रेस’च्या वार्षिक अधिवेशनात जारी केलेल्या मसुदा बजेट दस्तावेजात प्रस्तावित संरक्षण बजेट वाढीची घोषणा करण्यात आली आहे. २०१६ पासून सलग आठव्या वर्षी संरक्षण बजेटमध्ये वाढ झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. २०२० मध्ये चीनचा विकासदर ६.६ टक्के होता, तर २०२१ मध्ये तो ६.८ टक्के झाला आणि २०२२ मध्ये सध्या ७.१ टक्के आहे.परंतु, सरकारी कामाच्या अहवालानुसार चीनच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आर्थिक स्थिरतेला प्राधान्य देण्याची आणि विकासाचा पाठपुरावा करणे आवश्यक असल्याचे ली केकियांग यांनी म्हटले आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत चीनने अहवालात उच्च आर्थिक निर्देशक नमूद केले आहेत. त्यांनी रोजगारासाठी उच्च उद्दिष्टे ठेवली असून २०२३ मध्ये १२ दशलक्ष नवीन शहरी नोकर्‍या निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. २०२३च्या मसुद्याच्या अर्थसंकल्पानुसार, चीनचे वार्षिक संरक्षण बजेट सीएनवाय १.५५३७ ट्रिलियन युआनपर्यंत वाढेल, असा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, चिनी आर्थिक अधिकार्‍यांनीही विश्वास व्यक्त केला की, ते १२ दशलक्ष नवीन नोकर्‍या निर्माण करून ग्राहक खर्चाला प्रोत्साहन देऊन सुमारे पाच टक्केवाढीचे लक्ष्य पूर्ण करू शकतात. कमकुवत किरकोळ, वाहन आणि घरांच्या विक्रीमुळे आयातीची मागणी कमी झाल्याने चिनी अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्याच्या प्रयत्नांना जागतिक परिणाम दिसू लागले आहेत. हा देश त्याच्या आशियाई शेजार्‍यांसाठी सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ आहे आणि पाश्चात्य कंपन्यांसाठी महसुलाचा स्रोत आहे. या वर्षी रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट १२ दशलक्ष आहे, जे गेल्या वर्षीच्या ११ दशलक्ष उद्दिष्टापेक्षा जास्त आहे. ते निर्यात आणि गुंतवणुकीऐवजी ग्राहक खर्चावर आधारित स्वावलंबी वाढ वाढवण्याच्या आणि चीनला मौल्यवान तंत्रज्ञानाचा निर्माता बनवून समृद्धी आणि जागतिक प्रभाव निर्माण करण्याच्या सत्ताधारी पक्षाच्या योजनांच्या अनुषंगाने आहे.

एकीकडे चीन आपली अर्थव्यवस्था सुधारण्याच्या मागे लागला असताना, दुसरीकडे केनियामध्ये चिनी व्यापार्‍यांविरोधातील निदर्शने तीव्र झाली आहेत. येथील हजारो स्थानिक व्यावसायिक बॅनर पोस्टर घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. चिनी व्यापारी आपला माल ४५ टक्के स्वस्त विकत आहेत. त्यामुळे स्थानिक व्यापार्‍यांचे मोठे नुकसान होते. चिनी व्यापारी आणि कंपन्या स्थानिक व्यापार्‍यांना संपवण्यासाठी सर्व प्रकारचे डावपेच अवलंबत असल्याचा आरोप व्यापार्‍यांनी केला आहे. स्थानिक व्यापार्‍यांना बाजारपेठेतून बाहेर फेकले जावे, यासाठी नियोजनाचा भाग म्हणून चिनी व्यावसायिक हे करत असल्याचे काही व्यापार्‍यांनी सांगितले. फेब्रुवारीमध्ये या स्थानिक व्यावसायिकांनी चीनविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आणि रस्त्यावर उतरले. विरोध इतका वाढला की, दि. २६ फेब्रुवारीला चिनी चौकातील सर्व दुकाने बंद करावी लागली.
 
 
’आफ्रिकन न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, चीनने केवळ केनियातच नाही, तर आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये नवीन प्रकारचा कट रचला आहे. स्थानिक बाजारपेठ आणि व्यापार्‍यांना मार्गावरून दूर करणे हा त्यामागचा उद्देश. यासाठी अनेक पद्धती वापरल्या जात आहेत. आश्चर्यकारक बाब म्हणजे, आतापर्यंत स्थानिक व्यापारी संघटना आणि केनिया सरकारने याबाबत काहीही सांगितलेले नाही. स्थानिक व्यापार्‍यांनी उपराष्ट्रपती व संसदेकडेही निवेदन दिले आहे. त्यावर विचार करण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक