अर्पण फाऊंडेशनच्या सायकल रॅलीत उत्साहाचे दर्शन

04 Mar 2023 16:50:25
 
Arpan Foundation
 
ठाणे : अर्पण फाऊंडेशन'तर्फे हिरानंदानी इस्टेट येथे आयोजित केलेल्या सायकल रॅलीच्या माध्यमातून लहान मुली-महिलांमधील उत्साहाचे दर्शन घडले. हिरानंदानी इस्टेटमध्ये सकाळी रंगलेल्या रॅलीत नागरिकांनीही स्पर्धकांना प्रोत्साहत देत स्पर्धेची रंगत वाढविली. त्यात ३०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.
 
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर `अर्पण फाऊंडेशन'तर्फे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यानुसार घोडबंदर सायकलिस्टच्या माध्यमातून जी सी वुमेन्स राईड्स सायकल रॅली काढण्यात आली. भाजपाच्या प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, उपाध्यक्षा श्वेता शालिनी, कासारवडवली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेश बाबशेट्टी यांच्यासह मान्यवरांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखविला. आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी स्पर्धेला उपस्थित राहून स्पर्धकांना प्रोत्साहन दिले. यावेळी भाजपाचे महापालिकेतील माजी गटनेते मनोहर डुंबरे, अर्पण फाऊंडेशनच्या अध्यक्षा भावना डुंबरे, घोडबंदर सायकलिस्टचे पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.
 
घोडबंदर रोड परिसरातून ५, १० आणि २० किलोमीटरची रॅली निघाली. या रॅलीच्या मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी महिलांचे स्वागत केले. तसेच सर्वांचा उत्साह वाढविला.
 
 
Arpan Foundation
Powered By Sangraha 9.0