पाकिस्तानात पीठ वाटपावेळी चेंगराचेंगरीत ११ ठार

30 Mar 2023 21:30:41
wheat-flour-distribution-in-pakistan-11-killed-in-two-days


लाहोर
: पाकिस्तान सरकारने गरीबांना गव्हाचे पीठ मोफत देण्याची योजना आणल्यानंतर वितरण केंद्रांवर चेंगराचेंगरीच्या घटना घडत आहेत. यात गेल्या दोन दिवसांत एकटया पंजाब प्रांतात ११ जणांचा बळी गेला आहे. कर्जबाजारी झालेल्या शहाबाज शरीफ सरकारने काही दिवसांपूर्वी मोफत पीठ योजना जाहीर केली. त्यानंतर महागाईशी संघर्ष करणार्‍या पाकिस्तानात चेंगराचेंगरी तसेच लुटमारीचे प्रमाण वाढले आहे.

Powered By Sangraha 9.0