धनुष्यबाण चोरला तरी प्रभू राम माझ्यासोबत : उद्धव ठाकरे

30 Mar 2023 18:00:15
uddhav-thackeray-slam-to-cm-eknath-shinde-bjp-on-ram-navmi
 

मुंबई : शिवसेनेचा धनुष्यबाण काही काळासाठी चोरला आहे, पण श्रीराम माझ्यासोबत आहेत, असे विधान उद्धव ठाकरेंनी केले आहे. कागदवरच धनुष्यबाण नेला असला तरी हे बाण माझ्या भात्यात आहेत, ही ब्रह्मास्त्र माझ्यासोबत आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. रामनवमीनिमित्त ठाकरे गटाचे कार्यकर्ते मातोश्रीवर एकत्र जमले होते त्यावेळी त्यांना संबोधित करत असताना हे विधान ठाकरेंनी केले.
 
प्रभू रामाचं नाव लिहून दगड तरंगत होते. आता राजकारणात प्रभू रामाचं नाव घेऊन ते तरंगत आहेत. आता दगडच तरंगतात आणि दगडच राज्य करतात, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला आहे. लोकशाही वाचवणं माझं एकट्याचं काम नाही. पुढील पिढ्यांसाठी आपल्याला एकत्र यावं लागेल. आपण सगळे एकत्र आलो, तर लंकादहन करू शकणार नाही का, असे ही ठाकरे यावेळी म्हणाले.
.
Powered By Sangraha 9.0