दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे

30 Mar 2023 21:15:12
shivaji-maharajs-national-memorial-should-be-irected-in-delhi-demand-by-udayanraje-to-amit-shah


नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्ली येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक उभारावे आणि राष्ट्रपुरूषांचा अवमान रोखणारा कायदा करावा, अशी मागणी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेऊन केली आहे.
 
छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि कर्तृत्व जगासमोर मांडण्यासाठी देशाची राजधानी दिल्ली येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक’ उभारावे, छत्रपती शिवाजी महाराजांचे शासनमान्य अधिकृत चरित्र प्रकाशित करावे आणि महारापुरूषांचा अवमान रोखण्यासाठी कठोर कायदा करावा, अशी मागण्या घेऊन खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.यावेळी गृहमंत्री शाह यांनी उदयनराजे भोसले यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. महापुरूषांचा अवमान रोखण्यासाठी लवकरच कार्यवाही करू, असे आश्वासनही दिले.




Powered By Sangraha 9.0