दिल्लीच्या जहांगीरपुरीमध्ये हिंदूंची उत्स्फुर्त श्रीरामनवमी शोभायात्रा

गतवर्षी हनुमान जयंती मिरवणुकीवर झाला होता हल्ला

    30-Mar-2023
Total Views |
ram-navami-2023-procession-live-updates

नवी दिल्ली
: दिल्लीतील जहांगीरपुरी परिसरात गुरुवारी हिंदू समाजाने उत्स्फुर्तपणे श्रीरामनवमी शोभायात्रा काढली. गतवर्षी याच जहांगीरपुरीमध्ये हनुमान जयंती शोभायात्रेवर मुस्लिमांनी हल्ला करून दंगल घडविली होती.

दरवर्षी रामनवमीच्या निमित्ताने देशाच्या इतर भागांप्रमाणेच दिल्लीतही हिंदू संघटनांचे लोक मिरवणुका काढतात. यावेळीही रामनवमीला शोभा यात्रा काढण्यासाठी हिंदू संघटनांनी दिल्ली पोलिसांकडे परवानगी मागितली होती, मात्र वर्षभरापूर्वी हनुमान जयंतीला झालेल्या जातीय दंगलीमुळे पोलिसांनी धार्मिक संघटनांना शोभा यात्रा काढण्याची परवानगी नाकारली होती.
 
दिल्ली पोलिसांच्या या भूमिकेमुळे हिंदू संघटनांचे लोक संतप्त झाले होते. हिंदू समुदायाने गुरुवारी शांततेत मिरवणूक काढण्याचे संकेत त्यांनी पोलिसांना दिले होते. त्यानुसार, गुरुवारी हिंदू समुदायाने अतिशय शांततेत मात्र ठामपणे श्रीरामनवमी शोभायात्रा काढली. यावेळी हिंदू समुदाय हजारोंच्या संख्येने उपस्थित होता.दरम्यान, गतवर्षी या परिसरात १६ एप्रिल रोजी हिंदू समुदायाने हनुमान जयंतीची शोभायात्रा काढली होती. त्यावर तेथील मुस्लिमांनी हल्ला करून दंगल घडविली होती.


 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.