रामजन्माच्या वेळी आकाशात कोणती शुभ नक्षत्रे होती? कोणता राजयोग होता?

30 Mar 2023 12:41:12

ram 
 
मुंबई : रामाचा जन्म बहुप्रतिक्षित होता. अयोध्येला बऱ्याच वर्षानंतर अनेक प्रयासा-सायासांनी राज्याचा वारस प्राप्त झाला होता. रामजन्म कोणत्या शुभमुहूर्तावर होतो हे तपासण्यासाठी राज्यातील श्रेष्ठ गुरु तसेच अनेक जोतिषी पंचांग घेऊन बसले होते. राम जन्माच्यावेळी अनेक शुभ ग्रहांची युती आकाशात होती तर रामाच्या कौटुंबिक जीवनात, वैवाहिक जीवनात अनेक अडचणी येतील परंतु रामाच्या आयुष्यात नजीकच्या काळातच राजयोग लिहिलेला होता.
 
चैत्र मासातल्या शुक्ल पक्षातील नवमीला मध्यानीच्या वेळेस रामजन्म झाला. सूर्य प्रखर तेजाने डोक्यावर तळपत होता. बाळाला आशीर्वाद देत होता. आकाशात पुनर्वसू नक्षत्र विराजमान होते. ग्रहांची स्थितीही शुभ म्हणावी अशी होती. यावेळी, सूर्य, मंगल, बृहस्पती, शुक्र आणि शनी आपल्या उच्चं राशीत विराजमान होता. या शुभ ग्रहांच्या उपस्थितीत त्रेता युगात विष्णूच्या सातव्या रूपाने अवतार घेतला.
 
 
Powered By Sangraha 9.0