महेश काळेंची नेमकी चूक काय?

    30-Mar-2023
Total Views |
 
mahesh kale
 
मुंबई : सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे यांच्यावर दोन दिवसांपासून 'रोजा जानेमन' आणि शब्दांच्या पलीकडचे ही दोन गीते एकत्र केल्यामुळे टीका झालीय, त्यात नक्की महेश यांची चूक काय हा प्रश्न पडतो. महेश काळे हे शास्त्रीय संगीत व भारतीय शास्त्रीय संगीतातील राग आळवणारे गायक म्हणून प्रसिद्ध आहेत. अभिषेकी बुवा यांच्याकडे त्यांचे संगीताचे शिक्षण झाले आहे. त्यांची आईही शास्त्रीय गीते गाते. घरापासूनच या संगीताचा वारसा लाभलेले महेश काळे शास्त्रीय उत्तम गातात. परंतु, हिंदी सिनेमातील गीते त्यांना शास्त्रीय पठडीत बसवून त्यावर प्रयोग करायला आवडतात असे अजून काही व्हायरल झालेल्या व्हिडीओ मधून दिसते. ते तेवढेसे जमात नसल्याने त्यांचे हंसे होते. 
 
महेश यांनी यापूर्वीही असे फ्युजन संगीत मैफिलींतून गाण्याचे प्रयत्न केले होते. सराव न करता केलेले हे प्रयोग फसतात. महेश यांचा या फ्युजन मागील हेतू शुद्ध आहे. तरुणांना शास्त्रीय संगीताची ओळख व्हावी म्हणून त्यांची गाणी विविध रंगांची आलापन करत गातात. परंतु संगीताचा कान नसलेल्या रसिकालाही पूर्वतयारी न करता केलेल्या या प्रयोगातील फोलपणा जाणवतो. तर निव्व् ळ  शास्त्रीय मैफिल ऐकण्यास आलेला रसिकही यामुळे दुखावला जातो. महेश यांनी निव्वळ तरुणांच्या मैफिली किंवा फेसबुकवरून हे प्रयोग केले तर त्यांना उत्तम प्रतिसाद मिळू शकतो.
 
काहींचे म्हणणे असे आहे, महेश उत्तम गात असले तरीही अनेक उत्तम गाणाऱ्या गायकांमध्ये उठून दिसण्यासाठी असा काहीतरी पब्लिसिटी स्टंट महेश करतात. जुने व्हिडीओ अचानक उकरून काढण्याची त्यांची सवय पाहून तसे वाटणे आणि असणे स्वाभाविक आहे असे वाटते.